Join us

कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होत नाही, चरबी घटत नाही? लिव्हरची समस्या छळतेय का, तपासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:44 IST

How To Detox Liver: न्यूट्रिशनिस्टनुसार, लिव्हर वजन कमी करण्यात अडथळा निर्माण करतं. त्यामुळे तुम्हाला जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर त्याआधी लिव्हर डिटॉक्स करणं गरजेचं ठरतं.

How To Detox Liver: लठ्ठपणा वाढणं ही एक वेगानं वाढणारी समस्या बनत आहे. एकदा का लठ्ठपणा वाढला तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या शरीरात घर करततात. इतकंच नाही तर एकदा वाढलेली चरबी कमी करणंही खूप अवघड ठरतं. त्यामुळे शरीरात वाढत असलेली चरबी कंट्रोल करणं खूप महत्वाचं ठरतं. पण अनेकदा प्रयत्न करूनही वजन काही कमी व्हायचं नाव घेत नाही. जर तुमच्यासोबतही असंच होत असेल तर याला कारणीभूत लिव्हर हा अवयव असू शकतो. न्यूट्रिशनिस्टनुसार, लिव्हर वजन कमी करण्यात अडथळा निर्माण करतं. त्यामुळे तुम्हाला जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर त्याआधी लिव्हर डिटॉक्स करणं गरजेचं ठरतं.

न्यूट्रिशनिस्ट रमिता कौर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, लिव्हर शरीरातील फॅट बर्न करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. पण जर काही कारणानं लिव्हरचं काम स्लो झालं तर मेटाबॉलिज्मही स्लो होतं. ज्यामुळे अॅस्ट्रोजन क्लीअरन्स प्रभावित होतं, ज्यामुळे तुम्हाला ब्लोटिंग, वजन वाढण्याची समस्या होऊ शकते. लिव्हरमध्ये फॅट जमा झाल्यानं पोट आणि कंबरेच्या आजूबाजूची चरबी वाढू लागते. अशात लठ्ठपणा कमी करण्याआधी लिव्हर डिटॉक्स करणं महत्वाचं ठरतं.

लिव्हर डिटॉक्स कसं कराल?

लिंबू पाणी

लिव्हरसाठी लिंबू खूप फायदेशीर ठरतं. रोज सकाळी १ ग्लास लिंबू पाणी प्यायल्यास लिव्हरमध्ये जमा विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. लिंबू पाण्यानं लिव्हर डिटॉक्स होतं आणि पित्ताचा प्रवाह सुद्धा वाढतो.

मेथीचं पाणी

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी मेथीचे दाणे खूप प्रभावी ठरतात. याचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी हलकं कोमट करून प्यावं. यानं लिव्हर मजबूत होईल आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होईल. तसेच लिव्हरवरील सूजही कमी होईल.

बिटाचा ज्यूस 

लिव्हर साफ करण्यासाठी बीट खूप फायदेशीर मानलं जातं. रोज बिटाचा ज्यूस प्यायल्यास लिव्हर डिटॉक्स होतं. यात बीटाइन तत्व भरपूर असतं, जे वजन कमी करण्यासही मदत करतं.

हळदीचं दूध

आयुर्वेदात हळदीच्या दुधाचे अनेक फायदे सांगितले आहेत. लिव्हरसाठी हळद खूप फायदेशीर असतं. लिव्हर डिटॉक्ससाठी दुधात चिमुटभर हळद आणि काळी मिरी पूड टाकून प्याल तर फायदा मिळेल. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स