Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सवतीसाठी केलं लिव्हर डोनेशन, नवऱ्यावरच्या प्रेमापोटी केला मोठा त्याग! व्हायरल चर्चा, निर्णय योग्य की मूर्खपणा..

सवतीसाठी केलं लिव्हर डोनेशन, नवऱ्यावरच्या प्रेमापोटी केला मोठा त्याग! व्हायरल चर्चा, निर्णय योग्य की मूर्खपणा..

Liver donation for co-wife, she donated her liver, women can do anything for family , Saudi news : या महिलेने केले असे काही सगळेच झाले अवाक. सवतीसाठी माया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2025 17:53 IST2025-08-11T17:52:08+5:302025-08-11T17:53:37+5:30

Liver donation for co-wife, she donated her liver, women can do anything for family , Saudi news : या महिलेने केले असे काही सगळेच झाले अवाक. सवतीसाठी माया.

Liver donation for co-wife, she donated her liver, women can do anything for family , Saudi news | सवतीसाठी केलं लिव्हर डोनेशन, नवऱ्यावरच्या प्रेमापोटी केला मोठा त्याग! व्हायरल चर्चा, निर्णय योग्य की मूर्खपणा..

सवतीसाठी केलं लिव्हर डोनेशन, नवऱ्यावरच्या प्रेमापोटी केला मोठा त्याग! व्हायरल चर्चा, निर्णय योग्य की मूर्खपणा..

कुटुंबासाठी एक स्त्री काहीही करु शकते. मात्र सौदीत राहणाऱ्या या महिलेने काही असे केले ज्यामुळे सगळ्या सोशल मिडियावर तिची चर्चा आहे. (Liver donation for co-wife,  she donated her liver, women can do anything for family , Saudi  news )सध्या प्रचंड व्हायरल झालेल्या एका बातमीनुसार सौदीत राहणाऱ्या एका महिलेने सवतीला लिव्हर डोनेट केले आणि लोकांनी आश्चर्य व्यक्त केले.

सौदीच्या तैफ शहरात राहणाऱ्या नोराह सालेम अल-शम्मरी या महिलेचे लग्न माजिद अल-रोकी सोबत झाले. तिकडे पती अनेक विवाह करु शकतो. ताग्रिद अवाद अल-सादी नावाच्या महिलेशी मजिदने दुसरे लग्न केले. मात्र तिला लग्नानंतर दीर्घकालीन आजाराचा सामना करावा लागला. तिला घेऊन तिचे कुटुंब दुबईच्या मोठ्या डॉक्टरांकडे गेले तसेच अमेरिकेतही जाऊन आले मात्र त्यांना यश आले नाही. उपचारांना यश येत नव्हते.
 
मजिदने सांगितले की, दुसरा काहीच पर्याय न उरल्याने तो स्वत:च्या यकृताचा भाग त्याच्या दुसऱ्या बायकोला द्यायला तयार झाला. ऑपरेशनला जाण्याआधी त्याने पहिल्या बायकोला त्याच्या ५ मुलांची काळजी घ्यायला सांगितले. जर ऑपरेशनमुळे त्याला काही झाले आणि दुसऱ्या बायकोला काही झाले तर नोराहवर अर्थात पहिल्या पत्नीवरच सगळी जबाबदारी होती.

पण नोराहने ठरवलं की पती नको, शक्य असल्यास मीच लिव्हरचा काही भाग डोनेट करते. पण ते सोपे नव्हते,  त्यानंतर तिला स्वतःला काही शारीरिक अडचणी उद्भवतील असे डॉक्टरांनी सांगितले. पण तरी तिने ते केलेच. तिच्या या दानामुळे ताग्रिद एकदम ठणठणीत बरीदेखील झाली. कुणाला यात नोराहचं मोठं मन दिसतंय तर कुणाला निव्वळ भावनिक मूर्खपणा. पण नोराहला जे शक्य होतं ते तर तिनं करुनच टाकलं.

Web Title: Liver donation for co-wife, she donated her liver, women can do anything for family , Saudi news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.