Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रोज ऐका आवडीची गाणी, 39 टक्के कमी होतो डेमेन्शियाचा धोका; संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 10:58 IST

Listening Music Benefits : नवीन रिसर्च सांगतो की रोज संगीत ऐकण्याची किंवा वाजवण्याची सवय डिमेन्शियाचा धोका कमी करते.

Listening Music Benefits : जर तुम्हाला दिवसाची सुरुवात तुमची आवडती गाणी ऐकून करायला आवडत असेल, तर ती केवळ तुमचा मूड चांगला करत नाही तर तुमची स्मरणशक्तीही मजबूत करत आहे. नवीन रिसर्च सांगतो की रोज संगीत ऐकण्याची किंवा एखादं वाद्य वाजवण्याची सवय डिमेन्शियाचा धोका कमी करते.

रोज संगीत ऐकणे इतके फायदेशीर का?

इंटरनॅशनल जर्नल ऑफ जिरियाट्रिक सायकायट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका ताज्या अभ्यासानुसार, 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे जे लोक रोज संगीत ऐकतात, त्यांना डिमेन्शिया होण्याची शक्यता 39% ने कमी असते. ऑस्ट्रेलियातील मोनाश युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 10,800 हून अधिक वृद्ध व्यक्तींच्या डेटाचे विश्लेषण केले. निष्कर्ष असा निघाला की, जे लोक रोज संगीत ऐकत होते, त्यांची कॉग्निटिव क्षमता जास्त चांगली होती. त्यांच्यात कॉग्निटिव डॅमेजचा धोका 17% कमी आढळला. तसेच त्यांची एपिसोडिक मेमरीही चांगली होती.

संगीत खरोखर मेंदू वाचवतं का?

अल्झायमर असोसिएशननुसार, जगभरात सुमारे 70 लाख लोक या आजाराने प्रभावित आहेत. वय वाढत असताना डिमेन्शियाचे प्रमाण वाढते, अशावेळी संगीत हा सोप्पा, नैसर्गिक आणि कमी खर्चाचा उपाय मानला जातो.

संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष

वाद्य वाजवणे किंवा गाणे गायल्याने डिमेन्शियाचा धोका 35% कमी होते. संगीत ऐकणे + वाजवणे दोन्ही डिमेन्शियाचा धोका 33% कमी करतात आणि कॉग्निटिव इम्पेअरमेंटचा धोका 22% कमी करतात. अभ्यासाच्या सह-लेखिका एमा जॅफा यांच्या मते, “संगीत ऐकताना मेंदूचे अनेक भाग एकाच वेळी सक्रिय होतात जणू पूर्ण मेंदूचा व्यायामच!”

याआधी करण्यात आलेल्या संशोधनात आढळले आहे की संगीत भाषा सुधारते, स्मरणशक्ती वाढवते, प्रोसेसिंग स्पीड वाढवते आणि समन्वय सुधारते.

डिमेन्शियाचा धोका कमी करण्यासाठी इतर सोपे उपाय

जीवनात उद्देश असणे

2025 मधील American Journal of Geriatric Psychiatry च्या अभ्यासात दिसले की, ज्यांच्या जीवनात स्पष्ट उद्देश असतो ते मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर राहतात आणि डिमेन्शियाचा धोका कमी असतो.

आठवड्यात फक्त 35 मिनिटे व्यायाम

Johns Hopkins च्या 2025 च्या अभ्यासानुसार, आठवड्यात फक्त 35 मिनिटे मध्यम किंवा जलद व्यायाम केल्यास धोका 41% कमी होतो.

सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणे

AMA (2024) च्या संशोधनात सांगितले की, कुटुंबीय आणि मित्रांसोबत संपर्कात राहिल्याने मेंदूची कॉग्निटिव रिजर्व वाढते, ज्यामुळे मानसिक नुकसानाचा धोका कमी होतो.

रोज घरकाम करणे

2023 मध्ये Frontiers in Psychology च्या अभ्यासात आढळले की, नियमित घरकाम करणाऱ्या लोकांमध्ये डिमेन्शियाचा धोका खूप कमी असतो.

तर या साध्या सवयी तुमच्या मेंदूचे वय कमी ठेवू शकतात आणि वृद्धापकाळात मानसिक आरोग्य मजबूत ठेवतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Listen to music daily; reduce dementia risk by 39%: Study

Web Summary : Daily music listening reduces dementia risk by 39%, a study reveals. Playing instruments, singing, staying socially active, and regular housework also help maintain cognitive health and reduce dementia risk in older adults.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स