Join us

मुलांनी अजिबात खाऊ नयेत असे ८ पदार्थ, लहान वयात केस पांढरे- वाढते शुगर आणि वजन भरमसाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 18:41 IST

Foods kids should avoid: Unhealthy foods for children: डॉक्टर म्हणतात मुलांना ८ पांढरे पदार्थ चुकूनही खाऊ घालू नका. जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेहाचा धोका वाढतो.

बाळ जन्माला आलं की, ७ ते ८ महिन्यानंतर मुलांना पौष्टिक आणि घरचे पदार्थ खाऊ घातले जातात.(Kids Health) मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची काही वर्ष ही त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी महत्त्वाची असतात.(Child obesity) कोणत्या वयात मुलांना काय खाऊ घालावे, त्याचा त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो. याविषयी अनेकदा पालकांना विशेष काळजी घ्यायला सांगितली जाते. (Foods kids should avoid) वाढत्या वयात मुलांच्या आहारात पौष्टिक, खनिजे आणि आवश्यक जीवनसत्त्व असणारे पदार्थ खाऊ घालण्याचा सल्ला पालकांना दिला जातो.(Unhealthy foods for children) पण बदलेल्या जीवनशैलीनुसार मुलांना बाहेरचे पिझ्झा, बर्गर किंवा इतर मैद्याचे पदार्थ खायला भरपूर आवडतात.(Childhood obesity causes) हे पदार्थ खाण्यासाठी मिळाले नाही तर ते अतिहट्टपणा किंवा रडरड सुरु करतात.(High sugar foods for children) ज्याचा मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेहाचा धोका वाढतो. डॉक्टर म्हणतात मुलांना ८ पांढरे पदार्थ चुकूनही खाऊ घालू नका. 

मुलांनी रात्री किती वाजता झोपणं आवश्यक? पालकांनी करावं १ काम, मुलांसाठी फार आवश्यक

डॉक्टर रवी मलिक म्हणतात ८ पांढरे पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. म्हणून ते जास्त प्रमाणात खाऊ घालू नका. ज्यामुळे शरीरावर परिणाम होतो. मुलांच्या रक्तातील साखर वाढून मधुमेहाचा त्रास वाढतो. इतकेच नाही तर या पदार्थांमुळे शरीरात फॅट्स देखील वाढते.ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. 

पांढऱ्या ब्रेडमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स भरपूर असते. ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर नाही. रिफाइंड पीठात कार्बोहायड्रेट्स असतात आणि यात फायबर नसते. पांढरा तांदूळ हा मुलांच्या आरोग्यासाठी हानिकार आहे. डॉक्टर म्हणतात मीठाचा वापर शक्य तितक्या कमी प्रमाणात करावा. एक वर्षापेक्षा लहान असणाऱ्या मुलांना मीठ देऊ नये. साखर ही २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नका. मुलांच्या आहारात शक्य तितकी कमी साखर देण्याचा प्रयत्न करावा. मुलांना नूडल्स, पिझ्झा, बर्गर खायला खूप आवडते पण यामुळे त्यांचे आरोग्य बिघडून पोटाचा त्रास वाढतो. बिस्किटांमधील क्रीम दूधापासून बनवलेली असते. त्यामुळे क्रीमचे बिस्कीटे मुलांना खाऊ घालू नका. दुधापासून बनवलेले पदार्थ देखील मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतात. 

डॉक्टर म्हणतात मुलांना पांढरा ब्रेड देण्याऐवजी आपण त्यांना मल्टीग्रेन ब्रेड देऊ शकता. रिफाइंड मैद्याऐवजी आपण त्यांना रवा किंवा पीठापासून बनवलेले पदार्थ खाऊ घाला. पांढऱ्या तांदळाऐवजी तपकिरी रंगाचा तांदूळ खायला घाला. मुलांना ताजी फळे, भाज्या, सुकामेवा, डाळी आणि शेंगा खाऊ घाला, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारु शकते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलहान मुलं