Join us

किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:20 IST

किडनी फेल होणं म्हणजे काय, त्यामागची कारणं कोणती, लक्षणं काय हे जाणून घेऊया...

टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. 'हम साथ साथ है', 'मै हूँ ना' ते टीव्हीवरील 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. सतीश ७४ वर्षांचे होते आणि किडनीच्या आजाराने त्रस्त होते. किडनी फेल होणं म्हणजे काय, त्यामागची कारणं कोणती, लक्षणं काय हे जाणून घेऊया...

किडनी फेल होणं म्हणजे काय?

किडनी फेल होणं ही एक गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये किडनी योग्यरित्या काम करणं थांबवतं. किडनीचं काम शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचं काम करतात. ते ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास, शरीरातील मिनरल्स संतुलन राखण्यास आणि RBC तयार करण्यास देखील मदत करतात. जेव्हा किडनी खराब होते तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, ज्यामुळे परिस्थिती बिघडू शकते आणि जर उपचार केले नाहीत तर ते जीवघेणं ठरू शकतं.

किडनी फेल होण्यामागची २ प्रमुख कारणं

डायबेटीस

किडनी फेल होण्यामागे अनेक कारणं असू शकतात, परंतु सामान्यतः दोन प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे डायबेटीस. डायबेटीस असलेल्यांना किडनी फेल होण्याचा धोका जास्त असतो. दीर्घकाळ ब्लड शुगर जास्त असल्यास किडनीच्या नसा खराब होतात. हळूहळू हे फिल्टर योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत, ज्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता कमी होते.

हाय ब्लड प्रेशर

हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना किडनी फेल होण्याचा धोका जास्त असतो. हाय ब्लड प्रेशरमुळे किडनीच्या रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडतो. कालांतराने, या रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि किडनी रक्त योग्यरित्या स्वच्छ करू शकत नाहीत. यामुळे गंभीर नुकसान होऊ शकतं, अगदी किडनी फेल देखील होऊ शकते. किडनी इन्फेक्शन, स्टोनचा त्रास होतो.

किडनी फेल होण्याचे दोन प्रकार

Acute Kidney Failure - हे काही दिवसांत किंवा आठवड्यात अचानक होतं. कधीकधी औषधं, इन्फेक्शन किंवा दुखापतींमुळे किडनी अचानक कमकुवत होते. उपचारानंतर बरं होता येतं.

Chronic Kidney Failure - ही समस्या काही महिने किंवा वर्षांमध्ये हळूहळू वाढते. या स्थितीत किडनी हळूहळू कार्य करणं थांबवते आणि पूर्णपणे खराब देखील होऊ शकते.

किडनी फेल होण्याची लक्षणं

हात, पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणं

थकवा आणि अशक्तपणा जाणवणं

लघवीचे प्रमाण कमी होणं

मळमळ, उलट्या, भूक न लागणं

श्वास घेण्यास त्रास होणं किंवा छातीत जडपणा

लक्ष केंद्रित करण्यात अडचण

खाज सुटणे किंवा कोरडी त्वचा

'या' गोष्टींची घ्या काळजी

किडनी निरोगी ठेवण्यासाठी ब्लड शुगर साखर आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणं महत्त्वाचं आहे. यासाठी तज्ज्ञ दररोज पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही औषध घेऊ नका. योग्य आहार घ्या आणि दररोज व्यायाम करा. जर तुम्हाला डायबेटीस किंवा ब्लड प्रेशर असेल तर नियमितपणे किडनीची तपासणी करणं गरजेचं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actor Satish Shah passes away due to kidney failure: causes, symptoms

Web Summary : Actor Satish Shah passed away due to kidney failure at 74. Diabetes and high blood pressure are major causes. Symptoms include swelling, fatigue, and reduced urination. Control blood sugar and pressure to maintain kidney health.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स