Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > किडनीचं काम बिघडलं की पायांचं तंत्रही बिघडतं, पायांवर दिसतात ‘ही’ लक्षणं, दुर्लक्ष करुच नका..

किडनीचं काम बिघडलं की पायांचं तंत्रही बिघडतं, पायांवर दिसतात ‘ही’ लक्षणं, दुर्लक्ष करुच नका..

Kidney Problem Sign In Legs : बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं, पण रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची समस्या किडनी योग्यपणे काम करत नसल्यावर वाढते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 14:39 IST2025-07-12T11:03:26+5:302025-07-12T14:39:32+5:30

Kidney Problem Sign In Legs : बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं, पण रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची समस्या किडनी योग्यपणे काम करत नसल्यावर वाढते.

Kidney damaged symptoms appear in the legs while you resting | किडनीचं काम बिघडलं की पायांचं तंत्रही बिघडतं, पायांवर दिसतात ‘ही’ लक्षणं, दुर्लक्ष करुच नका..

किडनीचं काम बिघडलं की पायांचं तंत्रही बिघडतं, पायांवर दिसतात ‘ही’ लक्षणं, दुर्लक्ष करुच नका..

Kidney Problem Sign In Legs : किडनीसंबंधी आजारांचा धोका आजकाल खूप वाढला आहे. किडनीमध्ये काहीही गडबड झाली तर शरीर वेगवेगळे संकेत देतं. पण या संकेतांना सामान्य समजून त्यांकडे लोक दुर्लक्ष करतात. मग पुढे समस्या अधिक वाढते. किडनीसंबंधी आजाराचं एक कॉमन लक्षण म्हणजे रेस्टलेस लेग्स सिंड्रोम. यात रात्री झोपतेवेळी पाय सततत हलवण्याची तीव्र इच्छा होते. ही इच्छा रोखताही येत नाही. ही एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं, पण रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची समस्या किडनी योग्यपणे काम करत नसल्यावर वाढते.

रेस्टलेस लेग्स सिंड्रोम काय आहे?

indiatv.in च्या एका रिपोर्टनुसार, रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची समस्या आपण आराम करत असताना होते. लोक या स्थितीला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात जसे की, पायांमध्ये वळवळ होते, झिणझिण्या येतात किंवा पायांमध्ये ताण जाणवतो. अशात पाय हलवल्यावर थोडा वेळ आराम मिळतो, पण जसे पाय हलवणे बंद करता तेव्हा पुन्हा पायांमध्ये त्याच गोष्टी जाणवतात. यामुळे झोप न येण्याची समस्या होते.

रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची समस्या कुणालाही होऊ शकते. खासकरून किडनी समस्या असलेल्यांमध्ये किंवा जे डायलिलिसवर आहेत त्यांच्यात अधिक बघायला मिळते. रिसर्च सांगतो की, २० ते ३० टक्के डायलिसिसच्या रूग्णांमध्ये रेस्टलेस लेग्स सिंड्रोमचा त्रास बघायला मिळतो.

किडनीच्या रूग्णांना ही समस्या का होते?

यूरिक अॅसिड जमा होणे

जेव्हा किडनी योग्यपणे रक्त फिल्टर करत नाहीत, तेव्हा शरीरात यूरिक अॅसिड जमा होतं. हे विषारी तत्व नसा खराब करू शकतं, ज्यामुळे पायांमध्ये अस्वस्थता जाणवते.

खनिज असंतुलित होणे

किडनी योग्यपणे काम करत नसतील तर शरीरात कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि मॅग्नेशिअमसारख्या आवश्यक खनिजांचं संतुलन बिघडतं, ज्यामुळे रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची समस्या होते.

रक्ताची कमतरता

बऱ्याच किडनीच्या रूग्णांच्या रक्तात लाल रक्तपेशी कमी होतात. ज्याला अॅनिमिया म्हणतात. यामुळे सुद्धा रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची समस्या होते. 

डायलिलिसचा प्रभाव

ज्या लोकांचं डायलिसिस केलं जातं, त्यांना सुद्धा रेस्टलेस लेग्स सिंड्रोमचा धोका अधिक असतो.

बचावाचे उपाय?

आयर्न भरपूर घ्या

किडनीची समस्या असल्यावर शरीरात आयर्नची कमतरता होते. जर तुमच्यात आयर्न कमी झालं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं आयर्नची औषधं घ्या. शरीरात योग्य प्रमाणात आयर्न असेल तर बराच फरक पडतो.

सवयींमध्ये बदल

पौष्टिक आहार घ्या. भरपूर पाणी प्या. अ‍ॅक्टिव रहा आणि नियमित व्यायाम करा. झोपण्याची एक वेळ ठरवा आणि ती फॉलो करा. झोपण्याआधी थोडा हलका व्यायाम करा.

Web Title: Kidney damaged symptoms appear in the legs while you resting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.