Join us

पाणी प्यायल्यावर लगेच 'ही' लक्षणं दिसणं म्हणजे किडनी डॅमेजचे संकेत, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:07 IST

Kidney signs after drinking water: जर तुमची किडनी योग्य पद्धतीनं काम करत नसेल तर पाणी प्यायल्यानंतर काही लक्षणं दिसतात. ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. चला जाणून घेऊ काय आहेत ती लक्षणं.

Kidney signs after drinking water: आजकाल भरपूर लोक किडनीसंबंधी आजारांचे शिकार होत आहेत. किडनीचा काही आजार झाला तर याची शरीरात काही लक्षणं दिसतात. पण कधी कधी काहीच लक्षणं दिसत नाहीत. अशात जेव्हा किडनीसंबंधी आजाराची लक्षणं दिसू लागतात, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. काही गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर किडनीसंबंधी आजार ओळखता येऊ शकतात. आज किडनीसंबंधी आजारांची अशीच काही लक्षणं तुम्हाला सांगणार आहोत. जर तुमची किडनी योग्य पद्धतीनं काम करत नसेल तर पाणी प्यायल्यानंतर काही लक्षणं दिसतात. ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. चला जाणून घेऊ काय आहेत ती लक्षणं.

१) किडनीमध्ये वेदना

जेव्हा किडनी योग्यपणे काम करत नाही, तेव्हा फिल्टर प्रक्रिया स्लो होते. यामुळे पाणी किडनीतून हळुवारपणे ब्लॅडरकडे म्हणजे ओटीपोटाकडे जातं. अशात जेव्हाही तुम्ही पाणी पिता तेव्हा किडनीमध्ये पाणी जास्त जमा होतं आणि यामुळे पाणी प्यायल्यानंतर किडनीमध्ये वेदना होतात.

२) मळमळ-उलटी

जेव्हाही काही किडनीसंबंधी काही समस्या होते, तेव्हा मळमळ-उलटी ही सगळ्यात सामान्य लक्षणं दिसतात. तसेच जर किडनीची समस्या जास्तच वाढली असेल तर पाणी प्यायल्यावर लगेच मळमळ आणि उलटी अशी लक्षणं दिसतात. त्यामुळे असं काही होत असेल तर याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवा.

३) चक्कर येणं

ज्या लोकांमध्ये किडनी खूप आधीपासून खराब असेल किंवा योग्यपणे काम करत नसेल अशा लोकांना नेहमीच चक्कर येते किंवा डोकं गरगरतं. खासकरून जास्त पाणी प्यायल्यावर किडनीवर दबाव वाढतो आणि यामुळे डोकं गरगरतं. तसेच डोकं दुखतं सुद्धा.

४) लगेच लघवी लागणं

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावं लागत असेल तर हा किडनी खराब होत असल्याचा किंवा झाल्याचा संकेत असू शकतो. मात्र, हिवाळ्यात किंवा एसीमध्ये जास्त राहिल्यानं सुद्धा पाणी प्यायल्यावर लगेच लघवी लागू शकते. तरी सुद्धा एकदा किडनीची टेस्ट केलेली बरी.

५) अचानक थकवा-कमजोरी

किडनी खराब झाल्यामुळं जास्तीत जास्त लोकांना दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवते. मात्र, पाणी प्यायल्यानंतर लगेच अचानक कमजोरी किंवा थकवा जाणवत असेल तर हा किडनी गंभीरपणे खराब झाल्याचा संकेत असू शकतो. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य