Kidney Damage Cause : शरीरात सगळ्याच अवयवांकडे काहीना काही जबाबदारी असते. म्हणजे शरीरातील वेगवेगळ्या क्रिया पार पाडण्यात ते महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यातील एक महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी आपल्या शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं महत्त्वाचं काम करते. त्यामुळे किडनी हेल्दी ठेवणं खूप गरजेचं आहे. पण आपण नकळतपणे काही अशा काही चुका करतो ज्यामुळे किडनीचं नुकसान होऊ शकतं. आपल्या रोजच्या आहारातील एक साधी सवय किडनीला हळूहळू डॅमेज (Kidney Damage) करते आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते. ही सवय बदलणं खूप आवश्यक आहे, नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. चला तर पाहुयात कोणती ही रोजची सवय आहे जी किडनीला नुकसान पोहोचवते.
किडनीला डॅमेज करते 'ही' सवय
जास्त मीठ खाणं!
मीठ आपल्या शरीरासाठी आवश्यक असलं तरी त्याचं अति सेवन किडनीवर मोठा ताण टाकतं. चला जाणून घेऊ कसं.
ब्लड प्रेशर वाढवतं
जास्त मीठ शरीरात पाणी धरून ठेवतं, त्यामुळे ब्लडचा वॉल्यूम वाढतो आणि रक्तवाहिन्यांवर ताण येतो. यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते. किडनीतील लहान रक्तवाहिन्या हा ताण सहन करू शकत नाहीत आणि हळूहळू खराब होतात.
किडनीवर दबाव
किडनीचं मुख्य काम म्हणजे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम यांचं संतुलन राखणं. जेव्हा आपण जास्त मीठ खातो, तेव्हा या अतिरिक्त सोडियमला बाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त मेहनत करावी लागते. सतत असा ताण आल्याने किडनीची फिल्टर करण्याची क्षमता कमी होते.
किडनी स्टोनचा धोका
जास्त मीठ खाल्ल्याने लघवीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. हे अतिरिक्त कॅल्शियम किडनीमध्ये साचून स्टोन निर्माण करतं, ज्यामुळे असह्य वेदना होतात. आणि किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होते.
प्रोटीनुरिया
जेव्हा किडनी डॅमेज होते, तेव्हा लघवीमधून प्रोटीन बाहेर पडू लागतं. या स्थितीला प्रोटीनुरिया म्हणतात आणि ही किडनीच्या आजाराचं एक महत्त्वाचं लक्षण आहे.
सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना ही सवय असल्याचं जाणवतही नाही. कारण आपण फक्त जेवणात मीठ घालतो तिथूनच नाही, तर प्रोसेस्ड फूड्स, पॅकेट स्नॅक्स, चिप्स, लोणची, सॉस, ब्रेड अशा पदार्थांमधूनही मीठ शरीरात जातं.
म्हणून फक्त जेवणात मीठ कमी करणं पुरेसं नाही. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करणं आणि आपण काय खातो, त्यात किती मीठ आहे हे समजून घेणं अत्यावश्यक आहे.
