Phone Side Effects On Night : खूप लोकांना सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखी आणि डोळ्यांत वेदना जाणवतात. अनेकांना वाटतं की उशिरा झोपल्यामुळे असं होतं, पण खरं कारण तुमचा मोबाईल फोन असू शकतो. रात्री झोपताना बहुतेक लोक आपला फोन उशीखाली किंवा अगदी जवळ ठेवून झोपतात. मोबाईल फोनमधून सतत घातक रेडिएशन बाहेर पडत असतात, ज्याचा परिणाम मेंदूवर होतो आणि तो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. चला जाणून घेऊया, या रेडिएशनचे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात.
मोबाईल फोनच्या रेडिएशनमुळे होणारे नुकसान
मोबाईलमधून निघणारी नीळी प्रकाशकिरणं शरीरात झोप आणणाऱ्या मेलाटोनिन या हार्मोनची कार्यक्षमता कमी करतात. यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडते. सकाळी उठल्यावर डोकेदुखी व डोळ्यांमध्ये ताण जाणवतो दीर्घकाळ वापरामुळे थकवा आणि तणाव वाढतो.
झोपताना मोबाईल किती दूर ठेवावा?
झोपताना मोबाईल फोन किमान तीन फूट अंतरावर ठेवावा. यामुळे त्यातून निघणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डपासून संरक्षण मिळतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मोबाईल फोनमधील रेडिएशनचा दीर्घकाळ परिणाम मेंदूच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतो.
मोबाईलची सवय कमी करण्यासाठी उपाय रात्री फोन सायलेंट मोडवर ठेवा. सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे झोपमोड होते. अलार्मसाठी घड्याळ वापरा. फोनचा अलार्म वापरण्याची गरज नाही, त्यामुळे फोनपासून अंतर राहील. फोनऐवजी पुस्तक वाचा. झोपण्यापूर्वी वाचन केल्याने मन शांत होतं आणि लवकर झोप येते. स्क्रीन टाइम कमी करा. विशेषतः झोपण्याच्या एक तास आधी फोनचा वापर टाळा.
मोबाईल आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असला तरी त्याचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. थोडं अंतर ठेवा, मन शांत ठेवा आणि शरीराला आरामदायी झोप द्या. तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे.
