बदलत्या हवामानाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे सर्दी, खोकला आणि घसा यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. (Ginger for cough relief)सतत खोकून आपणं हैराण होतो. अशावेळी सर्दी-खोकल्यासह ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी आणि नाक चोंदणे यांसारख्या गोष्टी देखील होतात. सर्दी-खोकला हा सामान्य आजार आहे. त्यामुळे अशावेळी आपण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी काही घरगुती उपाय करतो. (How ginger helps with cough and cold)
काही घरगुती उपायाचा वापर केल्याने आपल्याला यापासून सुटका मिळू शकते. आपल्या स्वयंपाकघरात हमखास मिळणारा पदार्थ म्हणजे आले.(Ginger tea for cold and flu relief) हा फक्त पदार्थांची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आले खोकला, सर्दी आणि खवखव बरी करण्यास मदत करते.(Ginger syrup for cough and cold) आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे घसा दुखत असेल किंवा कोरडा खोकला असेल तर त्यापासून सुटका होण्यास मदत होते. आल्याचे सेवन कसे करायला हवे जाणून घेऊया.
सर्दी-खोकल्यावर आले रामबाण
आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे खोकला, सर्दी आणि घसा खवखवण्याचा समस्यांपासून आराम देते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आल्यामध्ये असतात. आल्याचा रस प्यायल्याने सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. पचनक्रिया सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यास आले प्रभावी आहे. आल्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा प्रदान होते. आले हे प्राचीन औषधी आणि मसालेदार वनस्पती म्हणून ओळखली जाते. उलटी, मळमळ किंवा गर्भावस्थेत आले चघळल्याने आपल्याला आराम मिळतो.
चालताना-धावताना धाप लागते, अचानक बीपी वाढते? रोज करा ३ गोष्टी, हृदय राहिल निरोगी
आल्याचे सेवन कसे कराल?
सर्दी, खोकल्यासाठी आल्याचा चहा पिणे उपयुक्त ठरेल. यासाठी ताजे आले सोलून लहान तुकडे करा. हे तुकडे पाण्यात उकळवून त्यात एक लवंग आणि लिंबाचा रस घाला. दिवसातून दोन ते तीन वेळा
ही चहा प्यायल्याने घसा खवखवणे आणि खोकल्यापासून आराम मिळतो. आले कुस्करुन गरम पाण्यात उकळवून त्याचा काढा प्यायल्याने देखील आराम मिळतो. आल्याचा रस मधात मिसळून रिकाम्या पोटी घेतल्याने सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते.