Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कांद्याचे इवलेसे बी देते मजबूत ताकद, आहारात कांद्याचे बी - मधुमेह ते केशविकारांवर सोपा स्वस्त उपाय

कांद्याचे इवलेसे बी देते मजबूत ताकद, आहारात कांद्याचे बी - मधुमेह ते केशविकारांवर सोपा स्वस्त उपाय

kalonji for hair growth, natural immunity booster, onion seeds for better health : कांद्याचे बी आरोग्यासाठी चांगले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2026 13:22 IST2026-02-19T13:18:45+5:302026-02-19T13:22:22+5:30

kalonji for hair growth, natural immunity booster, onion seeds for better health : कांद्याचे बी आरोग्यासाठी चांगले.

kalonji for hair growth, natural immunity booster, onion seeds for better health | कांद्याचे इवलेसे बी देते मजबूत ताकद, आहारात कांद्याचे बी - मधुमेह ते केशविकारांवर सोपा स्वस्त उपाय

कांद्याचे इवलेसे बी देते मजबूत ताकद, आहारात कांद्याचे बी - मधुमेह ते केशविकारांवर सोपा स्वस्त उपाय

कांदा हा आपल्या रोजच्या  स्वयंपाकातील अविभाज्य घटक आहे. मात्र कांद्याइतकंच महत्त्वाचं असलेलं त्याचं  बी , कलौंजी किंवा मंगरैला म्हणून ओळखलं जातं. हे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानलं जातं. (kalonji for hair growth, natural immunity booster, onion seeds for better health )आयुर्वेदात आणि पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये या छोट्या काळ्या बियांचा वापर अनेक समस्यांवर केला जातो. आकाराने लहान असलं तरी त्यातील पोषक घटक शरीरासाठी मोठं काम करतात.

कांद्याच्या बियांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स, फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम, झिंक, तसेच आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स आढळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. बदलत्या हवामानात सर्दी-खोकला, घसा खवखवणे, अशक्तपणा जाणवणे अशा समस्या वारंवार होत असतील तर कांद्याचं बी नियमित  घेतल्यास फायदा होऊ शकतो. पचनसंस्थेसाठी कांद्याचं बी विशेष उपयुक्त मानलं जातं. अपचन, गॅस, पोट फुगणे, जडपणा जाणवणे अशा तक्रारींमध्ये हे बी आराम देऊ शकतं. यात असलेले नैसर्गिक घटक पचनक्रिया सुधारतात आणि आतड्यांच्या हालचाली सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे भूक नीट लागते आणि अन्न पचायला मदत होते.

मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास कांद्याचं बी उपयोगी ठरु शकते. तसेच कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास मदत केल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर मानलं जातं. नियमित आणि मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील सूज कमी होण्यासही मदत मिळू शकते. त्वचा आणि केसांसाठीही कांद्याच्या बियांचे फायदे अनेक आहेत. अँटी ऑक्सिडंट्समुळे त्वचेचा तजेला वाढण्यास मदत होते. काही लोक कांद्याच्या बियाचं तेल केसांच्या मुळांमध्ये लावतात, ज्यामुळे केस गळणे कमी होण्यास आणि केस मजबूत होण्यास मदत होते.

कसं वापरावं?
१) सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा कांद्याचं बी कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.
२) भाजी, पराठा, डाळ, लोणचं किंवा फोडणीमध्ये कांद्याचं बी घातल्यास चव वाढते आणि आरोग्यदायी गुणही मिळतात.
३) थोडं भाजून त्याची पूड करून मधासोबत घेण्याची पद्धतही काही जण वापरतात.
४) कांद्याच्या बियाचं तेल केसांना लावण्यासाठी वापरता येतं.

मात्र कोणतीही गोष्ट अगदी नैसर्गिक असली तरी ती योग्य प्रमाणातच घ्यावी. जास्त प्रमाणात घेतल्यास पोटदुखी किंवा इतर तक्रारी उद्भवू शकतात. गर्भवती स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या माता, लहान मुले किंवा एखादा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करावं.

Web Title : प्याज के बीज: छोटा बीज, बड़े स्वास्थ्य लाभ, सरल उपाय

Web Summary : प्याज के बीज, या कलौंजी, एंटीऑक्सिडेंट और पोषक तत्वों से भरपूर होते हैं। वे प्रतिरक्षा बढ़ाते हैं, पाचन में सहायता करते हैं और रक्त शर्करा को प्रबंधित करने में मदद करते हैं। प्याज के बीज का तेल लगाने से बालों का झड़ना कम हो सकता है। डॉक्टर से सलाह लेने के बाद умерен मात्रा में सेवन करें।

Web Title : Onion Seeds: Tiny Seed, Big Health Benefits, Simple Remedy

Web Summary : Onion seeds, or kalonji, are packed with antioxidants and nutrients. They boost immunity, aid digestion, and help manage blood sugar. Applying onion seed oil can reduce hair fall. Consume moderately after consulting a doctor.