Join us
Daily Top 2 Weekly Top 5

फक्त २ मिनिटे ‘असा’ श्वास घ्या, मनावरचा ताण-स्ट्रेस-डोकेदुखी चटकन जाईल पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2025 11:22 IST

Just breathe like this for 2 minutes, the stress and headache will go away quickly : या पद्धतीने श्वास घेणे ठरते आरोग्यदायी. पाहा काय करायचे.

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात शांत मन आणि निरोगी शरीर राखणे अनेकांसाठी आव्हान झाले आहे. परंतु आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याची आणि मन शांत करण्याची एक सोपी पद्धत आहे. ती म्हणजे दीर्घ श्वसन किंवा दीर्घ प्राणायाम. (Just breathe like this for 2 minutes, the stress and headache will go away quickly.)या क्रियेला योगशास्त्रात अनुलोम-विलोम म्हणतात. कधी भीती वाटली किंवा काही घटना घडली की दीर्घ श्वास घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे मनाला शांतता मिळते.  या प्रक्रियेत आपण हळूहळू आणि मोठा श्वास घेतो, मग तो काही क्षण आत धरुन ठेवायचा नंतर हळुवार सोडायचा. ही साधी कृती आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू पोहोचवते आणि मनाला विलक्षण शांती देते.

दीर्घ श्वसनाचे सर्वात मोठे फायदे म्हणजे मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे विचार करण्याची क्षमता वाढते, लक्ष केंद्रित राहते आणि चिडचिड, बेचैनी कमी होते. नियमित दीर्घ श्वसन केल्याने रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे थकवा आणि झोप न लागणे या समस्या कमी होतात. या श्वसनक्रियेमुळे रक्तदाब नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. शरीरातील ताणतणाव कमी होतो, कारण दीर्घ श्वसन करताना शरीरातील कॉर्टिसॉल (ताण निर्माण करणारे हार्मोन) कमी प्रमाणात तयार होते. परिणामी मन प्रसन्न आणि शरीर हलके वाटते.

दीर्घ श्वसन ही क्रिया पचनासाठीही उपयुक्त आहे. श्वास आत घेऊन थांबवताना पोटाचा दाब बदलतो, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचनतंत्र कार्यक्षम होते. तसेच ही पद्धत फुफ्फुसांची क्षमता वाढवते ज्यामुळे श्वास घेताना होणारा त्रास, दम्याचा त्रास किंवा श्वसनाशी संबंधित समस्या कमी होतात. दररोज सकाळी किंवा रात्री ५ ते १० मिनिटे दीर्घ श्वसन केल्यास शरीर आणि मन दोन्ही छान राहते.  

महत्त्वाचं म्हणजे ही एक अत्यंत सुरक्षित आणि सर्वांना करता येणारी क्रिया आहे. कोणतेही औषध, उपकरण किंवा विशेष तयारी नको फक्त शांत जागा, काही क्षण आणि थोडी एकाग्रता पुरेशी आहे. त्यामुळे सगळ्यांनी ही क्रिया करायला हवी. रोज मोजून दोन मिनिटे जरी हे केले तरी मानसिक आरोग्य सुधारेल. आणि त्यासोबत शरीरालाही फायदा होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Two-minute breathing technique: Relieve stress and headaches instantly.

Web Summary : Deep breathing, like Anulom-Vilom, calms the mind, boosts oxygen, and reduces stress. Regular practice improves focus, lowers blood pressure, aids digestion, and enhances lung capacity. Just two minutes daily promotes mental and physical well-being.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीव्यायामयोगासने प्रकार व फायदे