बदलत्या वातावरणात अनेकांना तब्येतीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. एकदा सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला की खोकून खोकून घसा दुखतो तरी खोकला जात नाही तर काहींचे नाकही बंद होते. अशा स्थितीत औषधांऐवजी काही घरगुती उपाय तुमचं काम सोपं करू शकतात, ज्यामुळे खोकला-सर्दीची समस्या दूर होऊ शकते. (Japanese Home Remedy For Cough)
सर्दी, खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी लोक जपानमध्येही हा उपाय करतात. जपानी लोक कांदा आणि मधाचा वापर करून हा उपाय करतात. ज्यामुळे घश्याला आराम मिळण्यास मदत होते. खोकला आणि घश्यातील खवखव दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी तुम्ही उपाय नक्कीच करून पाहा. (Home Remedy For Cough Sore Throat Get Instant Relief In Cold)
खोकल्यावर रामबाण उपाय काय
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये सर्दी, खोकला दूर करण्यासाठी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यात खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. जपानी लोक खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी हा उपाय करतात. एक मध्यम आकाराचा कांदा घ्या आणि कांदा न चिरता सोलून घ्या. नंतर कांद्याला खालच्या बाजूनं चाकूच्या मदतीनं एक खोल छिद्र पाडा. यात जवळपास २ चमचे मध घाला नंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घाला.
गॅसची फ्लेम ऑन करून कांदा गॅस वर ठेवा. जेव्हा मध हलकं गरम होईल तेव्हा त्यात २ चमचे सैंधव मीठ घाला. सैंधव मीठ नसेल तर तुम्ही दुसरं मीठसुद्धा घालू शकता. कोमट होईपर्यंत गॅसवर राहू द्या. नंतर गॅस बंद करून कोमट मधाचे सेवन करा. या पद्धतीनं मधाचे सेवन केल्यानं तुम्हाला घश्यात खवखव होणं, खोकला अशा समस्या उद्भवणार नाहीत.
खोकला दूर करण्याचे सोपे उपाय
सर्दी, खोकला दूर करण्यासाठी तुम्ही मध आणि सैंधव मीठाचा समावेश आहारात करू शकता. हा उपाय भारतातही बरेच लोक करतात. आयुर्वेदातसुद्धा सर्दी, खोकल्याची समस्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय परिणामकारक मानला जातो. २ चमचे मध, १ छोटा चमचा सैंधव मीठ एकत्र मिसळा. हे चाटण सर्दी-खोकल्याच्या समस्येवर उत्तम ठरेल.
