Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज चारीठाव जेवताय खरे, तरी होतंय कु-पोषण? रिसर्चचा धक्कादायक निष्कर्ष, घरच्या जेवणातही पोषणाचा अभाव

रोज चारीठाव जेवताय खरे, तरी होतंय कु-पोषण? रिसर्चचा धक्कादायक निष्कर्ष, घरच्या जेवणातही पोषणाचा अभाव

आपण घरचं, पौष्टिक खातो म्हणजे आपलं आरोग्य चांगलंच राहाणार अशी अनेकांना खात्री असते. पण या समजाला धक्का लावणारा निष्कर्ष ‘मल्टीविटॅमिन ब्राण्ड सुप्राडिन’ यांनी आपल्या एका अभ्यासानंतर प्रसिध्द केला आहे. हा निष्कर्ष सांगतो की आपल्या भारतीय आहारातून केवळ 70 टक्के किंवा त्याच्यापेक्षाही कमी पोषक तत्त्वं मिळतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 03:02 PM2021-09-11T15:02:42+5:302021-09-11T15:09:39+5:30

आपण घरचं, पौष्टिक खातो म्हणजे आपलं आरोग्य चांगलंच राहाणार अशी अनेकांना खात्री असते. पण या समजाला धक्का लावणारा निष्कर्ष ‘मल्टीविटॅमिन ब्राण्ड सुप्राडिन’ यांनी आपल्या एका अभ्यासानंतर प्रसिध्द केला आहे. हा निष्कर्ष सांगतो की आपल्या भारतीय आहारातून केवळ 70 टक्के किंवा त्याच्यापेक्षाही कमी पोषक तत्त्वं मिळतात.

It is true that you eat four meals a day, but these meal not able to give 100 percent nutrition as your body needed..Shocking findings of research, lack of nutrition even in home meals | रोज चारीठाव जेवताय खरे, तरी होतंय कु-पोषण? रिसर्चचा धक्कादायक निष्कर्ष, घरच्या जेवणातही पोषणाचा अभाव

रोज चारीठाव जेवताय खरे, तरी होतंय कु-पोषण? रिसर्चचा धक्कादायक निष्कर्ष, घरच्या जेवणातही पोषणाचा अभाव

Highlightsकाही काळानंतर आहारातल्या पोषण कमतरतेचा परिणाम आरोग्यावर होतो.आहारातून न भागवता आल्यानं बहुतेकजणांना ब 12, डी3 यासरख्या जीवनसत्त्वाची कमतरता राहून त्याचे परिणाम आरोग्यावर होतात.पोषण तत्त्वांची संपूर्ण निकड आहारातून न भागवता आल्यानं बहुतेकजणांना ब12, डी3 यासरख्या जीवनसत्त्वाची कमतरता राहिलेली आणि त्याचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर झालेले या अभ्यासातून आढळून आलं आहे.

 आरोग्य नीट राखायचं असेल तर शरीराचं पोषण नीट व्हायला हवं. या पोषणासाठी आहार महत्त्वाचा असतो. अनेकांना ही बाब समजल्यानं घरी शिजवलेलं ताजं अन्न खाण्यावर त्यांचा भर असतो. आपल्या रोजच्या आहारात ते धान्यं, कडधान्यं, फळं, भाज्या, ज्यूस, सूप, मांसाहार यांचा समावेश जाणीवपूर्वक करतात. आपण घरचं, पौष्टिक खातो म्हणजे आपलं आरोग्य चांगलंच राहाणार अशी त्यांची खात्री असते. पण या समजाला धक्का लावणारा निष्कर्ष ‘मल्टीविटामिन ब्राण्ड सुप्राडिन’ यांनी आपल्या एका अभ्यासानंतर प्रसिध्द केला आहे. हा निष्कर्ष सांगतो की आपल्या भारतीय आहारातून केवळ 70 टक्के किंवा त्याच्यापेक्षाही कमी पोषक तत्त्वं मिळतात.

छायाचित्र- गुगल

हा अभ्यास सांगतो की, आहारातून कमी प्रमाणात पोषण तत्त्व मिळतात याचा लगेच आरोग्यावर परिणाम होतो असं नाही. पण काही काळानंतर आहारातल्या पोषण कमतरतेचा परिणाम आरोग्यावर होतो. या निष्कर्षानंतर ही पोषण कमतरता दूर करण्यासाठी काय करायला हवं, काय खायला हवं.? असा प्रश्न अनेकांन पडला आहे.
मल्टीविटामिन ब्राण्ड सुप्राडिनने केलेल्या या संशोधनपर अभ्यासात 10 पैकी 9 पोषण तज्ज्ञ यांना य अभ्यासाचे निष्कर्ष पटलेले आहेत. या अभ्यासात 220 डॉक्टर्स आणि पोषण तज्ज्ञांचा समावेश होता. हा अभ्यास म्हणतो की भारतीय आहरातून शरीरास आवश्यक 100 टक्के पोषण मिळतच नाही.

छायाचित्र- गुगल

या अभ्यासात सहभागी झालेल्या एकूण डॉक्टरांपैकी 90 टक्के डॉक्टरांचं आपल्या रोजच्या आहारातून आपलं पूर्ण पोषण होत नाही. कारण आपल्या आहारात 70 टक्केच पोषण तत्त्वं मिळतात यावर एकमत झालं होतं. या संशोधनपर अभ्यासातून हे देखील दिसून आलं की पोषण तत्त्वांची संपूर्ण निकड आहारातून न भागवता आल्यानं बहुतेकजणांना ब12, डी3 यासरख्या जीवनसत्त्वाची कमतरता राहून त्याचे परिणाम आरोग्यावर होतात. इतकंच नाही तर भारतीय आहारात लोह, झिंक, कॅल्शियम, फॉलिक अँसिड आणि क जीवसत्त्वचीही कमतरता निर्माण होते.
आरोग्यासाठी घातक असलेली ही पोषणाची कमतरता दूर करण्यासाठी या अभ्यासात सहभागी झालेल्या 73 टक्के डॉक्टरांनी आणि पोषण तज्ज्ञांनी मल्टीविटामिन स्पलीमेण्ट घेण्याचा सल्ला दिला आहे.

छायाचित्र- गुगल

आपल्या पौष्टिक आहारातून आपल्याला पोषण तत्त्वं पुरेशी मिळत नाही , हा खरंतर आश्चर्यचकित करणारा निष्कर्ष वाटत असला तरी तो खरा आहे. आणि रोजच्या आहारातून आपल्या शरीराला लागणार्‍या जीवनसत्त्व आणि खनिजांची पूर्तता होवू शकत नाही , हे ही तितकंच खरं आहे. यासाठी जास्तीत जास्त पोषक आहार आणि सप्लिमेण्टस यावर भर द्यायला हवा.  कोणतीच सप्लीमेण्ट स्वत:च्या मनानं न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी, असंही अभ्यासक म्हणतात. या सप्लीमेण्टसमुळे शरीरातल्या उर्जेवरही सकारात्मक परिणाम होतो तसेच  यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटीच्या कामाशी संलग्नन असणारे  डॉ. जेनेम पी मेहता यांनी कोरोनासारख्या महामारीशी दोन हात करायचे असतील  तर आरोग्याला आधी प्राधान्य द्यायला हवं असं म्हटलं आहे. या अभ्यासातले पोषणासंदर्भाचे निष्कर्ष बघता आपल्या आहारातील पोषण कमतरता कशी भरुन काढायची याबाबत जबाबदारीनं विचार करणं ही आता काळाचीच गरज झालीये. अर्थात यासाठी प्रत्येकानं आपल्या डॉक्टर किंवा पोषण तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा असं अभ्यासक म्हणतात.

Web Title: It is true that you eat four meals a day, but these meal not able to give 100 percent nutrition as your body needed..Shocking findings of research, lack of nutrition even in home meals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.