Post-Meal Urination Causes: बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर लघवी येते किंवा अनेक हेल्थ एक्सपर्टही जेवण झाल्यानंतर लघवी करण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना असा सल्ला का दिला जातो? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर काही लोक जेवणानंतर लघवी लागण्याला डायबिटीस किंवना इतर एखाद्या आजाराशी जोडून बघतात. आपल्याला सुद्धा याबाबत प्रश्न पडत असेल तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत. सामान्यपणे अनेक हेल्थ एक्सपर्ट असं होण्याला सामान्य मानतात. पण काही केसेसमध्ये असं होणं एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो.
जेवण झाल्यावर लघवी का लागते?
जेवण केल्यानंतर शरीरात डायजेशनची प्रक्रिया वेगाने होते. अन्न पचवण्यासाठी शरीराला जास्त रक्ताची गरज असते. त्यामुळे ब्लड फ्लो पोट आणि आतडीकडे जातो. यादरम्यान किडनी सुद्धा जास्त अॅक्टिव होते आणि रक्त फिल्टर करण्याची प्रक्रिया वेगाने होते. ज्यामुळे लघवी सु्द्धा जास्त तयार होते आणि लघवी लागते. जेवण झाल्यानंतर लघवी लागण्याचं एक मोठं कारण तरल पदार्थ सुद्धा असतं. जर आपण जेवणासोबत पाणी, ज्यूस, छास किंवा सूप प्यायले असाल तर शरीर एक्स्ट्रा फ्लूइड लघवीच्या माध्यमातून बाहेर काढतं. ही शरीराची एक सामान्य प्रक्रिया असते.
थंडीत जास्त लघवी लागण्याची कारणं
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, थंडीच्या दिवसांमध्ये लोक चहा, कॉफी जास्त पितात. या पेयांमधील कॅफीन लघवी वाढवतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात जास्त लघवी लागण्याचं हेही एक मोठं कारण आहे. त्याशिवाय काही लोकांमध्ये जेवण झाल्यावर लघवी येण्याचं कारण ब्लड शुगर लेव्हलशी संबंधित असू शकतं. डायबिटीस असलेल्यांची जर शुगर लेव्हल वाढली असेल, तर शरीर अतिरिक्त ग्लूकोज लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. अशात पुन्हा पुन्हा लघवी लागणं एक इशारा असू शकतो, ज्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
वाढतं वयही लघवी जास्त लागण्याचं कारण
एक्सपर्टनुसार वय वाढण्यासोबतच ब्लॅडरची क्षमताही होते. वृद्धांमध्ये किंवा प्रोस्टेटसंबंधी समस्या असणाऱ्या पुरूषांना जेवण झाल्यावर लघवी लागणं कॉमन आहे. महिलांमध्ये हार्मोनल बदल किंवा यूरिनरी ट्रॅक्टशी संबंधित समस्याही याचं कारण असू शकतात. म्हणजेच काय तर जेवण झाल्यावर लघवी लागणं सामान्य आहे तर चिंतेची बाब नाही.
