अन्न हे पुर्णब्रह्म.. असं शिकविणारी आपली संस्कृती. त्यामुळेच अन्न वाया घालू नये, पानात काहीही टाकू नये असं आपल्याला शिकवलं जातं आणि आपणही ते पाळतो. त्यामुळे ज्याप्रमाणे पानात मोजकेच पदार्थ वाढले जातात त्याचप्रमाणे स्वयंपाक घरातही मोजूनमापूनच अन्न शिजवलं जातं. पण कधी कधी अंदाज हुकतो आणि मग बराच स्वयंपाक उरतो. अन्न वाया घालवावं वाटत नाही हे अगदी खरं. त्यामुळे मग अनेकजण ते फ्रिजमध्ये ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी खातात (is it good to eat leftover food?). पण असे शिळे पदार्थ खाणं खरंच योग्य आहे का याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही विशेष माहिती..
मंजिरी कुलकर्णी सांगतात की शिळ्या अन्नाबद्दल आजकाल बऱ्याच पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यात विशेषतः शिळा भात कसा चांगला असतो, त्यामध्ये वाढलेले प्रोबायोटीक आरोग्यासाठी कसे चांगले असतात किंवा शिळी पोळी शुगर कमी करण्यासाठी कशी चांगली असते अशा पोस्ट हल्ली बऱ्याच व्हायरल होत आहेत.
मलायका अरोरा रोज पिते 'ABC' ज्यूस, त्यामुळेच पन्नाशीतही दिसते तरुण- सुंदर, बघा हा कोणता ज्यूस...
पण या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे, हे एकदा जाणून घ्यायलाच हवं. शिळ्या भातामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. जेव्हा आपण भात शिजवतो तेव्हा ते स्टार्च ग्लुकोजमध्ये रुपांतरीत होतं. भात खाल्ल्यानंतर जर आपण व्यायाम केला नाही तर ते ग्लुकोज फॅटच्या स्वरुपात शरीरात जमा होत जातं.
संत्रीच्या सालींचं लोणचं खाल्लंय का? बघा पौष्टिक लोणच्याची चटपटीत रेसिपी, करायला एकदम सोपी
हाच भात जेव्हा आपण १२- १५ तासांनी खातो, तेव्हा मात्र भातामधलं स्टार्च अशा काही घटकांमध्ये रुपांतरीत होतं जे आपच पचवू शकत नाही. त्यामुळे त्याचा कॅलरी काऊंट कमी होतो. शिळ्या पोळीबाबतही हेच होत असतं.
शिळ्या अन्नाबाबतची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न शिजवल्यानंतर त्यामध्ये बदल होत असतो. वातावरणामध्ये असणारे असंख्य बॅक्टेरिया शिजवलेलं अन्न वापरायला सुरुवात करतात. नुसत्या डोळ्यांना दिसत नसलं तरी त्या अन्नावर त्यांची वाढ होत असते.
फक्त १७० रुपयांत घ्या सुंदर व्हेजिटेबल बॉक्स, फ्रिज दिसेल आवरलेलं-भाज्याही टिकतील जास्त
यादरम्यान ते बॅक्टेरिया अन्नातील पोषक तत्व जसे की प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट वापरतात आणि त्यांचे बायप्रोडक्ट बनवतात. हे बायप्रॉडक्ट आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. जेव्हा तुम्ही कुठलेही शिळे अन्न खाता तेव्हा तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती येते. कारण ह्या बायप्रोडक्टचा ताण तुमच्या लिव्हरला येतो आणि ते तुमच्या लिव्हरला डिटॉक्स करावे लागते. त्यामुळे शिळे अन्न कधीही अयोग्यच आहे. त्यामुळे पचनसंस्था, चयापचय संस्था यांच्याशी संबंधित आजार मागे लागू शकतात.