Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कुरकुरीत पापड खाण्याचा अन् वजन वाढण्याचा काही संबंध आहे का? पापड खाण्यापूर्वी वाचा..

कुरकुरीत पापड खाण्याचा अन् वजन वाढण्याचा काही संबंध आहे का? पापड खाण्यापूर्वी वाचा..

Papad Side Effects : पापडांची टेस्ट जरी चांगली वाटत असली तरी यानं काय नुकसान होतं याची कुणालाही कल्पना नसते. तळलेले किंवा भाजलेले कुरकुरीत पापड खाल्ल्यानं काय नुकसान होतं हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:12 IST2025-04-25T14:23:43+5:302025-04-25T16:12:59+5:30

Papad Side Effects : पापडांची टेस्ट जरी चांगली वाटत असली तरी यानं काय नुकसान होतं याची कुणालाही कल्पना नसते. तळलेले किंवा भाजलेले कुरकुरीत पापड खाल्ल्यानं काय नुकसान होतं हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Is Eating Papad Making You Fat? Know the facts | कुरकुरीत पापड खाण्याचा अन् वजन वाढण्याचा काही संबंध आहे का? पापड खाण्यापूर्वी वाचा..

कुरकुरीत पापड खाण्याचा अन् वजन वाढण्याचा काही संबंध आहे का? पापड खाण्यापूर्वी वाचा..

Papad Side Effects : जास्तीत जास्त लोकांना जेवणासोबत वेगवेगळे स्नॅक्स, चटण्या किंवा इतर पदार्थ खाण्याची सवय असते. लोणचे आणि पापड तर लोकांच्या जेवणातील महत्वाचा भाग असतात. सामान्यपणे तळलेला किंवा भाजलेला पापड जास्त लोक खातात. यांची टेस्ट जरी चांगली वाटत असली तरी यानं काय नुकसान होतं याची कुणालाही कल्पना नसते. तळलेले किंवा भाजलेले कुरकुरीत पापड खाल्ल्यानं काय नुकसान होतं हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पापड तयार करणाऱ्या अनेक फॅक्टरीजमध्ये स्वच्छतेची किती काळजी घेतली जाते हे आपल्याला माहीत नसतं. हे पापड वाळवण्यासाठी उन्हात मोकळ्या जागेत ठेवले जातात. त्यावर धूळ-माती जमा होते. 

बरेच लोक घरी तळलेले पापड खातात. पण तळलेल्या पापडांमध्ये तेल आणि फॅट दोन्ही अधिक प्रमाणात असतात. काही रिसर्चनुसार, तळलेल्या आणि मंद आसेवर भाजलेल्या पापडामध्ये एक्रिलामाइड हे टॉक्सिन अधिक प्रमाणात असतं. याने अस्वस्थपणा, घाबरणे आणि मूड स्विंग अशा समस्या होत असतात. 

दुकानातून खरेदी केलेल्या पापडांमध्ये नेहमी आर्टिफिशिअल फ्लेवर आणि मसाले टाकलेले आढळतात. या फ्लेवर आणि मसाल्यांमुळे पोटाची समस्या होऊ शकते. जास्त पापड खाल्ल्याने अपचनाची समस्या होऊ शकते. 

दोन पापड हे एका चपातीच्या बरोबरीत असतात. तसेच यात कॅलरीही भरपूर असतात. त्यामुळे तुम्हाला कॅलरी कमी करायच्या असतील तर पापड खाऊ नका.
तसेच फार जास्त काळासाठी पापड ताजे रहावे म्हणून पापड तयार करणाऱ्या कंपनी यात प्रिजरवेटीव्ह टाकतात. सोबतच यात मिठासोबत सोडियम सॉल्टही टाकतात. याने पापडाची चव वाढते. जास्त मीठ हे हार्ट आणि किडनीसाठी चांगलं नसतं.

Web Title: Is Eating Papad Making You Fat? Know the facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.