Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सद्गुरू सांगतात तांब्याच्या भांड्यात पाणी प्या 'हे' आजार बरे होतील; पाणी कसं, कधी प्यावं? वाचा

सद्गुरू सांगतात तांब्याच्या भांड्यात पाणी प्या 'हे' आजार बरे होतील; पाणी कसं, कधी प्यावं? वाचा

Is Drinking Hot Water In a Copper Bottle Good : तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं शरीरातील पित्त, कफचं संतुलन राहते. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:29 IST2025-09-17T13:10:35+5:302025-09-17T13:29:06+5:30

Is Drinking Hot Water In a Copper Bottle Good : तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं शरीरातील पित्त, कफचं संतुलन राहते. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.

Is Drinking Hot Water In a Copper Bottle Good For Health Know From Sadhguru Jaggi Vasudev | सद्गुरू सांगतात तांब्याच्या भांड्यात पाणी प्या 'हे' आजार बरे होतील; पाणी कसं, कधी प्यावं? वाचा

सद्गुरू सांगतात तांब्याच्या भांड्यात पाणी प्या 'हे' आजार बरे होतील; पाणी कसं, कधी प्यावं? वाचा

तांब्याच्या बॉटलमध्ये पाणी पिण्याची परंपरा भारतात खूप जुन्या काळापासून आहे. याला हजारो वर्ष जुनी आयुर्वेदीक थेरेपी मानलं जातं. यात ठेवलेलं पाणी अमृताप्रमाणे परीणाम करतं  (Copper Bottle Good For Health). कारण यात एंटी बॅक्टेरिअल, एंटी इंफ्लेमेटरी आणि डिटॉक्सिफाईंड गुण असतात. हेल्थ कॉन्शियस लोक कॉपर वॉटरचा आपल्या आहारात समावेश करतात पण तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याबाबत बरेच प्रश्न लोकांच्या मनात असतात. (Is Drinking Hot Water In a Copper Bottle Good)

तांब्याच्या बॉटलने पाणी प्यावे की नाही?

याबाबत सद्गुरू जग्गी वासुदेव सांगतात की तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं शरीरातील पित्त, कफचं संतुलन राहते. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. तांबे एक महत्वपूर्ण खनिज आहे.  जे शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यात एंटीमायक्रोबियल, एंटी इंफ्लेमेटरी, एंटी कार्सिनोजेनिक आणि एंटी ऑक्सिडेंट्स यांसारखे गुण असतात ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्याच्या प्रक्रियेला सपोर्ट मिळतो आणि नवीन पेशी तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावते.

तांब्याच्या बाटलीने पाणी पिण्याचे फायदे

आयर्न शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते. तांब्यानं इम्यूनिटी चांगली राहण्यास मदत होते. यामुळे पोटाच्या समस्या गॅस, एसिडीटीची समस्या उद्भवत नाही. कॉपरमुळे मेटाबॉलिझ्म दुरूस्त होण्यास मदत होते ज्यामुळे फॅट बर्निंग चांगले होण्यास मदत होते. कॉपर कोलोजन तयार करण्यास मदत करतात ज्यामुळे त्वचा ग्लोईंग राहते.

तांब्याच्या बॉटलमधून पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

तांब्याच्या भांड्यात किंवा बाटलीत पाणी भरून जवळपास ८ तास ठेवू शकता. यात तांब्यातील छोटे तत्व मिसळतात. सकाळी उठून हे पाणी प्यायल्यानं शरीराला जबरदस्त फायदे मिळतात. या प्रोसेसला ऑलिगोडायनेमिक इफेक्ट असं म्हणतात. या पाण्याला ताम्र जल किंवा कॉपर चाज्र्ड वॉटर असं म्हणतात. हे पाण्यातील घटक शुद्ध करण्याबरोबरच हानीकारक बॅक्टेरियांना नष्ट करते. 

तांब्याच्या बाटलीत पाणी पिणं योग्य आहे का?

एक्सपर्ट्स सांगतात की कॉपर बॉटलमध्ये फक्त सामान्य पाणी प्या. जास्त गरम पाणी घातल्यानं तांब्याची रिएक्शन वेगानं होऊ शकते. यामुळे शरीरातील टॉक्सिक इफेक्ट्स वाढतात. ज्यामुळे उलट्या, डोकेदुखी, लिव्हरवर परीणाम होतो. तांब्याच्या बॉटलमध्ये कधीच जास्त उकळवलेलं पाणी घालू नका. तांब्याच्या बाटलीत नेहमी रूम टेम्परेचरचं पाणी घाला.

कॉपर वॉटरचं सेवन कोणी करू नये?

ज्या लोकांचे लिव्हर कमकुवत आहे, किडनी पेशंट्स, गरोदर महिला, स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॉपर वॉटरचे सेवन करावे, हायपर एसिडिटी झाल्यास, विल्सन डिसिज झाल्यास, हॉर्ट प्रोब्लेम झाल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. 

Web Title: Is Drinking Hot Water In a Copper Bottle Good For Health Know From Sadhguru Jaggi Vasudev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.