Join us
Daily Top 2 Weekly Top 5

तांब्याच्या हंड्यातील पाणी प्यायल्यानं किडनीचे आजार होतात का? पाहा कुणी प्यावे, कुणी टाळावे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:43 IST

Is copper water bad for kidney : आज आपण तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे फायदे पाहणार आहोत आणि सोबतच याने किडनीसंबंधी समस्या होतात का हे जाणून घेणार आहोत.

Is copper water bad for kidney : हल्ली धावपळ इतकी वाढली आहे की, सगळ्यांनाच फिट रहायचं आहे. निरोगी रहायचं आहे. अशात हेल्थ एक्सपर्ट सतत सांगतात की, भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या. बरेच लोक आजकाल वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पितात. म्हणजे म्हणजे कुणी पाण्यात काहीतरी टाकून उपाशीपोटी पितात, तर काही लोक खास भांड्यातून पाणी पितात. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिण्याची पद्धत फार जुनी आहे. पण अलिकडे ती खूप जास्त वापरली जाते. तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी पिण्याचे अनेक फायदेही सांगितले जातात. पण अशीही चर्चा होते की, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने किडनीसंबंधी समस्या होते. अशात आज आपण तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे फायदे पाहणार आहोत आणि सोबतच याने किडनीसंबंधी समस्या होतात का हे जाणून घेणार आहोत.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

सकाळी उपाशीपोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं खूप फायदेशीर मानलं जातं. या पाण्याला उषा पान म्हणतात. जेव्हा पाणी तांब्याच्या संपर्कात येतं तेव्हा यातील गुण पाण्यात मिक्स होतात, ज्यामुळे पोटातील विषारी तत्व बाहेर पडतात. या पाण्याने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं आणि वजनही कमी होतं. या पाण्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. तसेच या पाण्याने इम्यूनिटीही वाढते.

कधी पिऊ नये तांब्याचं पाणी?

सतत तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. जेव्हा शरीरात कॉपरचं प्रमाण जास्त होतं, तेव्हा ते पिऊ नये. ज्या लोकांना अॅसिडिटी किंवा पोटात जळजळीची समस्या असते, त्यांनीही हे पाणी सांभाळून प्यावं. सोबतच काळजी घ्यावी की, कधीही तांब्याच्या भांड्यात दूध, दही किंवा कोणतेही आंबट पदार्थ टाकून पिऊ नये. उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील जास्त पाणी पिणं टाळलं पाहिजे.

तांब्याच्या भांड्यात किती वेळ ठेवावं पाणी?

तांब्याच्या भांड्यात पाणी जास्तीत जास्त १२ ते १५ तास ठेवावं. इतका वेळ पाण्याला आयुर्वेद गुण मिळण्यास पुरेसा आहे. रोज नवीन पाणी भरा आणि आधीचं पाणी काढून टाका. तांब्याचं भांड पूर्णपणे स्वच्छ असेल याची काळजी घ्या. जर भांड आतून काळपट झालं असेल किंवा हिरवं पडलं असेल तर त्यात पाणी ठेवू नये. हे भांड लिंबू आणि मिठाने घासून स्वच्छ करावं.

तांब्याच्या पाणी किडनीसाठी नुकसानकारक?

सामान्य स्थितीत तांब्याच्या भांड्यातील पाणी हे किडनीसाठी नुकसानकारक ठरत नाही. उलट याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. पण जर आपल्याला आधीच किडनीसंबंधी काही आजार असेल तर काळजी घ्यावी. जास्त कॉपर शरीरात जमा झाल्यास किडनी आणि लिव्हरवर अधिक दबाव पडतो. त्यामुळे किडनीच्या रूग्णांनी कॉपर वॉटर थेरपी सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. निरोगी आणि फिट लोकांसाठी हे पाणी सुरक्षित आहे, फक्त ते प्रमाणात घ्यावं.

English
हिंदी सारांश
Web Title : Copper water: Benefits, precautions, and its effect on kidneys.

Web Summary : Drinking copper water offers benefits like improved metabolism and immunity. However, excessive intake can be harmful, especially for those with kidney issues or acidity. Use cautiously and clean the pot regularly.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य