Join us

हाय ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर गरम पाण्यानं आंघोळ करावी की थंड? तज्ज्ञ सांगतात, पाण्यामुळेही वाढतं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:13 IST

High Blood Pressure: अनेकांना असाही प्रश्न पडतो की, हाय बीपी असल्यावर गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड पाण्यानं? हेच आज आपण पाहणार आहोत. 

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशर (High BP) ही एक अलिकडे फारच कॉमन समस्या झाली आहे. वय वाढलेल्या लोकांना होणारी ही समस्या आजकाल कमी वयातही अनेकांना होत आहे. चुकीची लाइफस्टाईल, जास्त तणाव, मसालेदार-तेलकट पदार्थ जास्त खाणं, फास्ट फूड ही याची कारणं असल्याचं हेल्थ एक्सपर्ट सांगत असतात. तसेच एकाच जागी जास्त बसून काम करणं, शरीराची हालचाल न करणं हेही याची कारणं आहेत. हाय बीपीसंबंधी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातील एक महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अनेकांना असाही प्रश्न पडतो की, हाय बीपी असल्यावर गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड पाण्यानं? हेच आज आपण पाहणार आहोत. 

प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडो यानी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी सांगितलं की, जर ब्लड प्रेशर नेहमीच जास्त राहत असेल तर नॉर्मल पाण्यानं आंघोळ केली पाहिजे. 

थंड पाण्यानं आंघोळीचे फायदे

ब्लड सर्कुलेशन सुधारतं

डॉक्टर रयान सांगतात की, थंड किंवा नॉर्मल पाण्यानं आंघोळ केल्यास नसा आकुंचन पावतात आणि नंतर पसरतात. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन अधिक सुधारतं. अशात हृदयावर दबावही कमी पडतो.

इम्यून सिस्टम मजबूत होतं

रोज थंड, कोमट किंवा नॉर्मल पाण्यानं आंघोळ केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

मानसिक शांतता

तसेच थंड किंवा नॉर्मल पाण्यानं आंघोळ केल्यास मन शांत राहतं. तणाव कमी होतो आणि मूड चांगला राहतो. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

गरम पाणी का नको?

गरम पाण्यानं आंघोळ केल्यावर शरीराला आराम नक्कीच मिळतो. पण हाय बीपी असलेल्यांसाठी हे पाणी योग्य मानलं जात नाही. कारण गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं रक्तवाहिन्या पसरतात, ज्यामुळे हृदयावर अधिक दबाव पडू शकतो. ब्लड प्रेशर अचानक वाढू शकतं. अशात जर कुणाला हाय बीपीची समस्या असेल तर त्यांनी जास्त गरम पाण्यानं आंघोळ न करता कोमट पाण्यानं आंघोळ करावी.

टॅग्स : हृदयरोगहेल्थ टिप्सआरोग्य