Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मासिक पाळी अनियमित-चिडचिड आणि घाम? इस्ट्रोजन होतंय कमी, करा हे ४ घरगुती उपाय तातडीनं

मासिक पाळी अनियमित-चिडचिड आणि घाम? इस्ट्रोजन होतंय कमी, करा हे ४ घरगुती उपाय तातडीनं

Irregular menstrual cycle-irritation and sweating? try these 4 home remedies urgently because Estrogen is decreasing : महिलांनी वेळीच करा उपाय. शरीरातील इस्ट्रोजन कमी होणे ठरले वाईट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2025 14:48 IST2025-11-18T14:44:34+5:302025-11-18T14:48:28+5:30

Irregular menstrual cycle-irritation and sweating? try these 4 home remedies urgently because Estrogen is decreasing : महिलांनी वेळीच करा उपाय. शरीरातील इस्ट्रोजन कमी होणे ठरले वाईट.

Irregular menstrual cycle-irritation and sweating? try these 4 home remedies urgently because Estrogen is decreasing | मासिक पाळी अनियमित-चिडचिड आणि घाम? इस्ट्रोजन होतंय कमी, करा हे ४ घरगुती उपाय तातडीनं

मासिक पाळी अनियमित-चिडचिड आणि घाम? इस्ट्रोजन होतंय कमी, करा हे ४ घरगुती उपाय तातडीनं

महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजन हा एक अत्यंत महत्त्वाचा हार्मोन आहे. मासिक पाळी सुरळीत ठेवण्यापासून ते त्वचेची चमक, हाडांची मजबुती, भावनिक स्थैर्य, झोप, केसांचे आरोग्य अशा अनेक महत्त्वाच्या कार्यांवर इस्ट्रोजन नियंत्रण ठेवतो. (Irregular menstrual cycle-irritation and sweating? try these 4 home remedies urgently because  Estrogen is decreasin)वयानुसार या हार्मोनमध्ये नैसर्गिक चढ-उतार होत असतात, परंतु काहीवेळा त्याची पातळी कमी होऊ लागल्यास शरीरात स्पष्ट बदल जाणवतात. या बदलांकडे वेळेत लक्ष दिल्यास अनेक तक्रारी सहज नियंत्रित करता येतात.

इस्ट्रोजन म्हणजे काय? तर तो महिलांच्या अंडाशयांमध्ये तयार होणारा प्रमुख स्त्री-हार्मोन आहे. शरीराला गर्भधारणेसाठी तयार ठेवणे, रक्तप्रवाह संतुलित ठेवणे आणि मनःस्थिती नियंत्रित ठेवणे ही त्याची मूलभूत कामे आहेत. स्त्रीच्या शरीरातील जवळपास प्रत्येक अवयवाशी या हार्मोनचा थेट संबंध असतो, म्हणूनच इस्ट्रोजनची पातळी कमी झाली की शरीर ताबडतोब संकेत द्यायला सुरुवात करते.

इस्ट्रोजन कमी झाल्यावर सर्वात पहिले मासिक पाळी अनियमित होते. काहींना अचानक गरम व्हायला लागते. शरीराचे तापमान वाढते आणि अचानक घाम फुटतो. त्वचा कोरडी आणि थकलेली दिसू लागते, केसांचे गळणे वाढते आणि झोप व्यवस्थित लागत नाही. मूडमध्ये सतत चढउतार जाणवतात, चिडचिड वाढते आणि ऊर्जा कमी असल्यासारखे वाटते. काही महिलांना लैंगिक इच्छा कमी झाल्यासारखे वाटते तर काहींना सांधेदुखी किंवा हाडे कमकुवत झाल्याचा अनुभव येतो. हे बदल सुरुवातीला हलके असू शकतात, पण इस्ट्रोजनची पातळी सतत घटत राहिली तर दैनंदिन जीवनावरही परिणाम होऊ शकतो.

या हार्मोनची पातळी कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वयानुसार होणारा मेनोपॉज आणि प्रिमेनॉपॉज हा सर्वात सामान्य बदल आहे. याशिवाय सततचा ताण, झोपेची कमतरता, फार कठोर डाएटिंग किंवा वजन खूप कमी असणे, थायरॉइडचे विकार, स्तनपानाचा काळ किंवा काही विशिष्ट औषधांचा परिणाम, यांमुळेही इस्ट्रोजन कमी होऊ शकतो. जीवनशैलीतील अति ताण आणि असंतुलित आहार हेही महत्त्वाचे कारण मानले जाते.

इस्ट्रोजनची पातळी नैसर्गिकरीत्या सुधारण्यासाठी आहारातील बदल अत्यंत प्रभावी ठरतात. दररोजच्या आहारात सोयाबीन, टोफू, अळशी, तीळ, हरभरा, राजमा, हिरव्या भाज्या, सफरचंद, डाळिंब, गाजर, बीट, रताळे आणि ओट्ससारखे पदार्थ समाविष्ट केल्यास शरीराला नैसर्गिक फाइटो-इस्ट्रोजन्स मिळतात, जे हार्मोनच्या संतुलनाला मदत करतात. हा आहार केवळ इस्ट्रोजनसाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठीही उपयुक्त असतो.

ताण नियंत्रित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ताण वाढल्यास कॉर्टिसॉल हा हार्मोन वाढतो आणि इस्ट्रोजनची पातळी अधिक घसरते. त्यामुळे ध्यान, श्वसनक्रिया किंवा स्वतःला शांत ठेवणाऱ्या साध्या सवयी रोजच्या दिनचर्येत समाविष्ट केल्या तर हार्मोनल संतुलन राखणे सोपे होते. अतिशय कठोर व्यायाम टाळून मध्यम प्रमाणात चालणे, योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा पिलाटेस यांसारखे व्यायाम शरीराला योग्य ऊर्जा देतात आणि अंतर्गत चयापचय सुधारतात. झोप व्यवस्थित मिळणेही आवश्यक आहे, कारण शरीरातील हार्मोन्स रात्री संतुलित होतात. रोज किमान सात ते आठ तासांची झोप इस्ट्रोजनची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करते. महिलांनी व्यायाम करायलाच हवा , मात्र इस्ट्रोजनची पातळी घटण्यामागे अति दगदग करणे हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे शरीराला झेपेल तेवढीच शारीरिक कृती करावी. 

Web Title : मासिक धर्म अनियमित, चिड़चिड़ापन? एस्ट्रोजन कम? ये घरेलू उपाय आजमाएं

Web Summary : एस्ट्रोजन की कमी महिलाओं के स्वास्थ्य को प्रभावित करती है, जिससे अनियमित मासिक धर्म, मूड स्विंग और थकान होती है। आहार, तनाव प्रबंधन और व्यायाम जैसे जीवनशैली में बदलाव से एस्ट्रोजन के स्तर को स्वाभाविक रूप से संतुलित करने में मदद मिल सकती है। हार्मोनल कल्याण के लिए नींद और मध्यम शारीरिक गतिविधि को प्राथमिकता दें।

Web Title : Irregular Periods, Irritation? Estrogen Low? Try These Home Remedies

Web Summary : Estrogen deficiency affects women's health, causing irregular periods, mood swings, and fatigue. Lifestyle changes like diet, stress management, and exercise can help balance estrogen levels naturally. Prioritize sleep and moderate physical activity for hormonal well-being.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.