Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत थकवा, डोकं दुखतं-शक्ती कमी म्हणजे शरीरात आयर्नची कमतरता, पाहा मोठ्या त्रासाची सुरुवातीची लक्षणं

सतत थकवा, डोकं दुखतं-शक्ती कमी म्हणजे शरीरात आयर्नची कमतरता, पाहा मोठ्या त्रासाची सुरुवातीची लक्षणं

Iron Deficiency Symptoms : शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आयर्नची कमतरता असल्यास हृदय आणि मेंदू दोन्हीवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:51 IST2026-01-23T10:11:52+5:302026-01-23T15:51:29+5:30

Iron Deficiency Symptoms : शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आयर्नची कमतरता असल्यास हृदय आणि मेंदू दोन्हीवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Iron deficiency symptoms : Signs of Anemia you should not ignore | सतत थकवा, डोकं दुखतं-शक्ती कमी म्हणजे शरीरात आयर्नची कमतरता, पाहा मोठ्या त्रासाची सुरुवातीची लक्षणं

सतत थकवा, डोकं दुखतं-शक्ती कमी म्हणजे शरीरात आयर्नची कमतरता, पाहा मोठ्या त्रासाची सुरुवातीची लक्षणं

Iron Deficiency Symptoms : आपल्याला अनेकदा असं वाटतं की ब्लड रिपोर्टमध्ये हीमोग्लोबिन नॉर्मल असेल, तर शरीरात रक्ताची किंवा आयर्नची कमतरता नाही. पण डॉक्टर शालिनी सिंग सोलंकी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमधून हा गैरसमज दूर केला आहे. त्यांच्या मते, आयर्नचं काम फक्त रक्त तयार करणं इतकंच नसतं. शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आयर्नची कमतरता असल्यास हृदय आणि मेंदू दोन्हीवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हीमोग्लोबिन नॉर्मल असतानाही शरीरात आयर्नची कमतरता असू शकते. डॉक्टर सोलंकी सांगतात की हीमोग्लोबिन कमी होणं हा आयर्न डेफिशिअन्सीचा शेवटचा टप्पा असतो. त्याआधी शरीर अनेक सूक्ष्म लक्षणांद्वारे इशारा देऊ लागतं. ही लक्षणं ओळखणं महत्त्वाचं आहे, कारण ऑक्सिजनची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास अवयवांना कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. चला तर जाणून घेऊया, आयर्नची कमतरता झाल्यावर शरीर कोणते संकेत देतं.

आयर्नची कमतरता असताना दिसणारी सुरुवातीची लक्षणं

डॉक्टर सोलंकी यांच्या मते, सकाळी उठताच थकवा जाणवणं आणि नीट रिफ्रेश वाटत नसेल, तर ते आयर्न कमतरतेचं लक्षण असू शकतं. थोडं चालल्यावर, जिने चढताना छातीत धडधड जाणवणं, व्यायाम करण्याची ताकद न वाटणं आणि स्नायूंमध्ये कमजोरी ही प्रमुख लक्षणं आहेत. हे सगळं शरीरात कमी ऑक्सिजन पोहोचत असल्यामुळे होतं.

मेंदू आणि वर्तनावर होणारा परिणाम

आयर्नची कमतरता थेट मानसिक आरोग्यावर परिणाम करते. मेंदूला पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्यास विचार करण्याची गती मंदावते आणि लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. अशा वेळी गोड खाण्याची तीव्र इच्छा वाढते, कारण शरीर झटपट ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतं. महिलांमध्ये मासिक पाळीनंतरही बराच काळ अशक्तपणा टिकून राहणं हेही आयर्न कमतरतेचं महत्त्वाचं लक्षण आहे.

बाह्य शारीरिक लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नका

डॉक्टर सोलंकी यांनी काही स्पष्ट बाह्य लक्षणांचाही उल्लेख केला आहे. ओठांच्या कोपऱ्यांत भेगा पडणं, जीभ सतत जळजळ करणं, किंवा साधी कामं करतानाही जास्त थकवा जाणवणं, हे आयर्नच्या कमतरतेचे संकेत असू शकतात. याचा अर्थ शरीरात हीमोग्लोबिन कमी होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.


रक्त तपासणी काय करावी?

ही माहिती आपल्याला शिकवते की आरोग्य फक्त एका रिपोर्टवर ठरवू नये. हीमोग्लोबिन नॉर्मल असलं तरी आयर्नची कमतरता आपल्या लाइफस्टाईलवर परिणाम करू शकते. त्यामुळे फक्त हीमोग्लोबिन टेस्टवर अवलंबून न राहता ‘फेरिटिन’ टेस्ट करून आयर्नचा साठा तपासणं आवश्यक आहे. वेळेत लक्ष दिल्यास हृदय आणि मेंदूशी संबंधित गंभीर आजार टाळता येऊ शकतात.

Web Title : लगातार थकान आयरन की कमी का संकेत: शुरुआती लक्षण देखें।

Web Summary : सामान्य हीमोग्लोबिन के बावजूद थकान महसूस हो रही है? यह आयरन की कमी हो सकती है। थकान, सांस फूलना और दिमागी कोहरे पर ध्यान दें। फेरिटिन परीक्षण महत्वपूर्ण है। दीर्घकालिक स्वास्थ्य समस्याओं को रोकने के लिए जल्दी समाधान करें।

Web Title : Constant fatigue signals iron deficiency: Early symptoms to watch for.

Web Summary : Feeling tired despite normal hemoglobin? It could be iron deficiency. Watch for fatigue, breathlessness, and brain fog. Ferritin test is crucial. Address early to prevent long-term health issues.