lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जागतिक महिला दिन: तिशीनंतर हाडं कमकुवत आणि आरोग्य ढासळू नये म्हणून, रोज खा ५ पदार्थ; कारण..

जागतिक महिला दिन: तिशीनंतर हाडं कमकुवत आणि आरोग्य ढासळू नये म्हणून, रोज खा ५ पदार्थ; कारण..

International Women's Day Special : Healthy Foods High in Calcium and Protien : कॅल्शियम आणि प्रोटीनने खच्चून भरलेत ५ पदार्थ, हाडं कमकुवत आणि वजन वाढू नये म्हणून खायलाच हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2024 01:28 PM2024-03-08T13:28:47+5:302024-03-08T13:29:45+5:30

International Women's Day Special : Healthy Foods High in Calcium and Protien : कॅल्शियम आणि प्रोटीनने खच्चून भरलेत ५ पदार्थ, हाडं कमकुवत आणि वजन वाढू नये म्हणून खायलाच हवे

International Women's Day Special : Healthy Foods High in Calcium and Protien | जागतिक महिला दिन: तिशीनंतर हाडं कमकुवत आणि आरोग्य ढासळू नये म्हणून, रोज खा ५ पदार्थ; कारण..

जागतिक महिला दिन: तिशीनंतर हाडं कमकुवत आणि आरोग्य ढासळू नये म्हणून, रोज खा ५ पदार्थ; कारण..

आज ८ मार्च. जागतीक महिला दिनानिमित्त (Women's Day 2024) सर्वत्र महिलांचा जागर होईल. शिवाय आज तिचा दिवस असल्याकारणाने तिच्या कार्याचे कौतुकही करण्यात येईल. सामाजिक असो किंवा राजकीय. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. मुख्य म्हणजे ती स्वतःचा नंतर आधी लोकांचे विचार करते (Health Tips). आंतरराष्ट्रीय महिला दिन ही केवळ महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी नाही तर, त्यांना आरोग्याबाबत जागरूक करणं देखील तितकेच गरजेचं आहे.

तिशीनंतर काही महिलांचे हाडं कमकुवत होतात, आरोग्य ढासळते (Calcium & Protien). पौष्टीक घटकयुक्त आहाराच्या कमतरतेमुळे आरोग्य बिघडते. जर आपल्याला तिशीनंतरही कायम सुदृढ आणि फिट राहायचं असेल तर, आपल्या आहारात ५ विशेष पदार्थांचा समावेश करा(International Women's Day Special : Healthy Foods High in Calcium and Protien).

यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात; महिलांना सुदृढ शरीर हवे असेल तर, आपल्या आहारात पौष्टीक घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे. ज्यात मुख्य म्हणजे प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त पदार्थांमुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. ज्यामुळे तिशीनंतर आपल्याला हाडांच्या निगडीत समस्या उद्भवणार नाही.'

नजर कमजोर-चष्म्याचा नंबर वाढतच चालला आहे? बाबा रामदेव सांगतात २ उपाय-नजर होईल तेज

महिलांसाठी कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त आहार का गरजेचं?

- कॅल्शियमयुक्त आहार फक्त मजबूत हाडांसाठी नसून, दातांसाठीही फायदेशीर ठरते. कॅल्शियम हाडांचा मुख्य घटक आहे. तिशीनंतर शरीराला कॅल्शियमची गरज भासते. ज्यामुळे हाडं मजबूत होतात. मजबूत हाडे केवळ फ्रॅक्चर होण्यापासून नसून, ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोका देखील टळतो.

- प्रोटीनयुक्त आहार खाल्ल्याने वजन कण्ट्रोलमध्ये राहते, यासह दीर्घकाळ पोट भरलेले राहते. मसल्स तयार करण्यासाठी प्रोटीन गरजेचं आहे. मजबूत स्नायूंमुळे केवळ दैनंदिन कामे करणे सोपे होत नाही तर चयापचय क्रिया देखील वाढते. ज्यामुळे पोटाचे विकार दूर राहतात.

दुग्धजन्य पदार्थ आणि पालेभाज्या

दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचा नैसर्गिक स्त्रोत आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. जे आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यासह पालेभाज्यांमध्ये देखील कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते.

सोयाबिन आणि शेंगदाणे

सोयाबिनमध्ये कॅल्शियमसह प्रोटीन देखील आढळते. त्याचप्रमाणे बदाम, अक्रोड, पिस्ता आणि चिया बियांमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असतात. आपण स्नॅक्स म्हणून या दोन्ही गोष्टी खाऊ शकता.

रोज खा ४ पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट्स न खाताही मिळेल भरपूर कॅल्शियम! हाडांची होणार नाही झिज

डाळी

विविध प्रकारच्या डाळींमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. शिवाय तीळ आणि गूळ यांचे मिश्रण खाल्ल्यानेही हाडे मजबूत होतात. आपण आपल्या आहारात नियमित डाळींचा समावेश करू शकता.

Web Title: International Women's Day Special : Healthy Foods High in Calcium and Protien

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.