Health Tips : सुई म्हणजेच इंजेक्शनचं नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. इंजेक्शन घेण्याची कल्पना करूनच अनेकांना वेदना होऊ लागतात. पण बरेच लोक असेही असतात, जे इंजेक्शनला अजिबात घाबरत नाही. दवाखान्यात गेल्यावर जेव्हा डॉक्टर इंजेक्शनमध्ये औषध भरतात, त्यानंतर त्यातील दोन ते तीन थेंब औषधं बाहेर काढतात, तेव्हाच सगळ्यात जास्त भीती वाटू लागते. पण आपल्याला माहीत आहे का की, डॉक्टर इंजेक्शनमधील काही थेंब औषध बाहेर का काढतात? मुळात डॉक्टर असं करून इंजेक्शनमधील हवेचा बुडबुडा बाहेर काढत असतात. याबाबत एक अशी धारणा आहे की, हवेचा एक जरी छोटा बुडबुडा व्यक्तीच्या शरीरात शिरला तर लगेच मृत्यू होऊ शकतो. पण खरंच हे इतकं भयंकर आहे का किंवा केवळ एक गैरसमज आहे? चला जाणून घेऊ.
हेल्थलाईनच्या एका रिपोर्टनुसार, जर शरीरातील ब्लड वेसल्समध्ये इंजेक्शनच्या माध्यमातून हवेचा बुडबुडा गेला तर त्याला एअर एम्बोलिज्म म्हटलं जातं. इंजेक्शनमधून १ ते २ थेंब बाहेर काढण्याचा उद्देश आहे की, इंजेक्शनमध्ये अजिबात हवा राहू नये. कारण हवा औषधासोबत नसांमध्ये जाऊ शकते. जर हवेचा बुडबुडा असेल तर तो हृदय, फुप्फुसं आणि मेंदूपर्यंत जाणाऱ्या रक्त प्रवाहाला ब्लॉक करू शकतो. ज्यामुळे शरीराच्या इतर अवयवांना मिळणारं ऑक्सीजन सप्लायमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
खरंच जीव जाऊ शकतो का?
मेडिकल एक्सपर्टनुसार, इंजेक्शनमधून जर शरीरात थोडी जरी हवा गेली तरी घाबरण्याची गरज नाही. पण जर हवा जास्त प्रमाणात शरीरात गेली तर ती घातक ठरू शकते. जास्तीत जास्त केसेसमध्ये जर फार कमी प्रमाणात जसे की, हवेचा एक बुडबुडा मसल्स किंवा नसांमध्ये जात असेल तर शरीर त्याला शोषून घेतं आणि तो आपोआप नष्ट होतो. जीवाला धोका तेव्हाच होऊ शकतो जेव्हा हवेचं प्रमाण अधिक असेल. छोटा बुडबुड्याने इंजेक्शन दिलेल्या जागी हलकं दुखतं.
किती हवा घातक?
हेल्थलाईननुसार, साधारण ५० ते १०० मिलीमीटर हवा शरीरात थेट रक्तवाहिनीत जात असेल तर धोका वाढतो. पण सामान्य इंजेक्शनमध्ये इतकी हवा येऊ शकत नाही. इंजेक्शन टोचताना जर थोडी हवा शरीरात गेली तरी नॅचरल सर्क्युलेशन सिस्टीम त्याला सहजपणे नष्ट करते.
शरीरात हवा गेल्यावर दिसणारी लक्षणं?
जर इंजेक्शन घेतल्यावर लगेच श्वास घेण्यास त्रास होत असेल, चक्कर येत असेल किंवा छातीत दबाव जाणवत असेल लगेच डॉक्टरांना सांगा. सुरूवातीला हे संकेत सामान्य असू शकतात. पण प्रत्येक स्थितीत सावध राहणं गरजेचं आहे. त्यामुळे नेहमी सल्ला दिला जातो की, इंजेक्शन टोचल्यानंतर दवाखान्यात थांबा.
Web Summary : Small air bubbles from injections are generally harmless as the body absorbs them. Larger amounts can block blood flow, posing risks to organs. Symptoms like breathlessness require immediate medical attention.
Web Summary : इंजेक्शन से छोटे हवा के बुलबुले आमतौर पर हानिरहित होते हैं क्योंकि शरीर उन्हें सोख लेता है। अधिक मात्रा में होने पर यह रक्त प्रवाह को अवरुद्ध कर सकता है, जिससे अंगों को खतरा हो सकता है। सांस फूलना जैसे लक्षणों के लिए तत्काल चिकित्सा ध्यान देने की आवश्यकता है।