Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जवळचं धुसर दिसतं-दृष्टी कमजोर झाली? व्हिटामीन ए भरपूर असलेले ५ पदार्थ खा, नजर होईल तेज

जवळचं धुसर दिसतं-दृष्टी कमजोर झाली? व्हिटामीन ए भरपूर असलेले ५ पदार्थ खा, नजर होईल तेज

Five Fruits Of Vitamin A To Improve Eyesights : गाजर आपल्या डोळ्यांसाठी परिणामकारक मानले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 20:15 IST2024-11-25T15:23:16+5:302024-11-26T20:15:50+5:30

Five Fruits Of Vitamin A To Improve Eyesights : गाजर आपल्या डोळ्यांसाठी परिणामकारक मानले जाते.

Include These Healthy Five Fruits Of Vitamin A in Your Diet To Improve Eyesights | जवळचं धुसर दिसतं-दृष्टी कमजोर झाली? व्हिटामीन ए भरपूर असलेले ५ पदार्थ खा, नजर होईल तेज

जवळचं धुसर दिसतं-दृष्टी कमजोर झाली? व्हिटामीन ए भरपूर असलेले ५ पदार्थ खा, नजर होईल तेज

डोळ्यांचे आरोग्य चांगले असणं तब्येतीसाठी फार महत्वाचे असते. अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे डोळ्यांवर चुकीचा परिणाम होतो. आजकाल सगळेचजण डिजिटल युगात काम करत असल्यामुळे डोळ्यांवर दबाव पडतो. फोन, टॅब्लेट, लॅपटॉपच्या अति वापरामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण पडतो आहे. आजकाल खाणं पिणं पौष्टीक नसल्यामुळे आतड्यांना पोषण मिळत नाही. ज्यामुळे सर्वाधिक लोकाना चश्मा लागत आहे. (Five Fruits Of Vitamin A To Improve Eyesights)

आहारतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ परमीत कौर यांनी डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. या फळांचा आपल्या आहारात समावेश केल्यास डोळ्यांची संबंधित समस्या उद्भवणार नाहीत. (Include These Healthy Five Fruits Of Vitamin A in Your Diet To Improve Eyesights)

रताळे

रताळे आपल्या डोळ्यांसाठी बरेच फायदेशीर ठरतात. यात व्हिटामीन ए असते जे डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. व्हिटामीन ए च्या कमतरतेमुळे डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतात. रताळ्याचे सेवन केल्यानं डोळ्यांचा कोरडेपणा  दूर होतो. रेटिनाची क्षमता वाढते. याशिवाय डोळे निरोगी राहण्याबरोबरच बीटा कॅरोटीन यातून मिळते. 

गाजर

गाजर आपल्या डोळ्यांसाठी परिणामकारक मानले जाते. गाजरात व्हिटामीन ए, बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. जे डोळ्यांची क्षमता सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. गाजराचा ज्यूस बनवून रोज सकाळी प्यायल्यानं डोळ्यांवर याचे चांगले परिणाम दिसून येतात. तुम्ही कच्च्या सॅलेडच्या स्वरूपातही खाऊ शकता. गाजराचे नियमित सेवन केल्यानं नाईट ब्लाईंडनेस सारख्या समस्यांचा धोका टळतो आणि दृष्टी चांगली राहते. 

आवळा

आयुर्वेदात आवळा एक महत्वपूर्ण औषध मानला जातो. डोळ्यांसाठी आवळा म्हणजे एक अमृतच आहे. आवळ्यात व्हिटामीन सी जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे डोळ्यांचे मसल्स मजबूत बनतात.  डोळ्यांना रक्त पुरवठा व्यवस्थित होतो. अनेकांना आवळ्याचा मुरांब्बा खायला फार आवडते. रिकाम्या पोटी आवळ्याचा  ज्यूस प्यायल्यानं डोळे चांगले राहतात.

पोटाची चरबी कमीच होत नाही? हे ५ फूड कॉम्बिनेशन्स ट्राय करा, भराभर कमी होईल फॅट

ब्ल्यूबेरी

डोळ्यांसाठी ब्लूबेरी खाणं फायदेशीर ठरतं. ब्लुबेरीमध्ये व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. जे फ्रि रॅडिकल्सपासून होणारं नुकसान वाचवतात. ब्लूबेरी स्नॅक्सच्या स्वरूपात खाल्ले जाते. ओट्स किंवा दह्यात घालूनही खाऊ शकता. 

हळदीचं दूध पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? दूधात ४ पदार्थ घाला, दुप्पट फायदे मिळवा

पपई

पपईत व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात असते. जे आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.  सुर्याच्या  हानीकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी पपई फायदेशीर ठरते. पपई तुम्ही सकाळी नाश्त्याला खाऊ शकता.  डोळ्यांमध्ये जळजळ आणि सूज असेल तर पपई खाल्ल्यानं आराम मिळतो. 

Web Title: Include These Healthy Five Fruits Of Vitamin A in Your Diet To Improve Eyesights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.