Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात भसाभस परफ्यूम मारून नाही जाणार घामाची दुर्गंधी, जरा हे ५ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2026 14:01 IST

In summer, the smell of sweat won't go away even with strong perfume, try these 5 simple solutions : घामाचा वास कमी करणारे घरगुती उपाय.

उन्हाळा वाढला की घाम येणे स्वाभाविक आहे. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी त्यासोबत येणारी दुर्गंधी मात्र अनेकांसाठी त्रासदायक ठरते. विशेषतः गर्दीत, ऑफिसमध्ये किंवा प्रवासात असताना ही समस्या अधिक जाणवते. पण घामाला वास का येतो आणि तो कसा थांबवता येईल, हे समजून घेतले तर हा त्रास सहज कमी करता येऊ शकतो.

प्रत्यक्षात घामाला वास नसतो. आपल्या त्वचेवर असलेल्या बॅक्टेरियांच्या संपर्कात घाम आला की दुर्गंधी निर्माण होते. शरीरातील अपोक्राइन ग्रंथी (विशेषतः बगल, मान, गुप्तांग भागात) जास्त सक्रिय झाल्या की त्या घामात प्रथिने आणि फॅटी अॅसिड्स सोडतात. (In summer, the smell of sweat won't go away even with strong perfume, try these 5 simple solutions)हे घटक बॅक्टेरियांसाठी अन्नासारखे असतात आणि त्यातूनच वास निर्माण होतो. याशिवाय, खूप तिखट किंवा मसालेदार अन्न, लसूण-कांद्याचे जास्त सेवन, स्वच्छतेचा अभाव, ताणतणाव, हार्मोनल बदल किंवा काही वेळा आरोग्याच्या समस्या यांमुळेही घामाला जास्त वास येऊ शकतो.

या समस्येवर घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. रोज अंघोळ करणे, विशेषतः घाम येणाऱ्या भागांची नीट स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. यासाठी साध्या पाण्यासोबत कधीम कोमट पाण्यात थोडा लिंबू किंवा मीठ घालून अंघोळ केल्यास त्वचेवरील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते.

लिंबू हा नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल घटक आहे. काखेत लिंबूरस लावल्यास दुर्गंधी कमी होते. तसेच बेकिंग सोडा देखील घामाचा वास कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो. तो त्वचेवर न लावता कपडे धुताना वापरावा.  तो ओलसरपणा कमी करतो आणि बॅक्टेरियांची वाढ थांबवतो. गुलाबपाणी किंवा चंदनाचा वापरही त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.

अंगावर घाम कमी यावा आणि वास येऊ नये यासाठी सैल, सूती कपडे घालणे खूप गरजेचे आहे. सिंथेटिक कपड्यांमुळे घाम अडकून राहतो आणि वास वाढतो. त्यामुळे शक्यतो कॉटन आणि सैलसर कापडांचा वापर करावा. पाणी जास्त प्रमाणात पिणेही महत्त्वाचे आहे. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी आणि घामाचा वास कमी करण्यासाठी हे मदत करते. आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तिखट, तेलकट आणि जास्त मसालेदार पदार्थ कमी खाल्ले तर घामाचा वास कमी होतो. त्याऐवजी फळे, भाज्या आणि हलका आहार घेतल्यास शरीर आतून स्वच्छ राहते. बडीशेप किंवा धणे पाणी यांसारखी पेयही शरीराला थंड ठेवतात आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात.  

English
हिंदी सारांश
Web Title : Beat summer sweat odor: 5 simple solutions, ditch the perfume.

Web Summary : Sweat itself is odorless; bacteria cause the smell. Combat body odor with hygiene, lemon, baking soda, cotton clothing, and a healthy diet. Hydration and avoiding spicy foods help.
टॅग्स : आरोग्यसमर स्पेशलत्वचेची काळजीहेल्थ टिप्सहोम रेमेडी