Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री सारखी जाग येऊन सतत झोपमोड होते, जाग येते? ३ आजारांचा धोका- शरीर काय सांगतंय ऐका..

रात्री सारखी जाग येऊन सतत झोपमोड होते, जाग येते? ३ आजारांचा धोका- शरीर काय सांगतंय ऐका..

Health Tips: रात्री जर तुम्हाला अजिबात शांत झोप येत नसेल तर हे काही बरं लक्षण नाही...(If you wake up multiple times from sleep in night you may have 3 health problems)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 20:31 IST2025-06-04T16:44:05+5:302025-06-04T20:31:43+5:30

Health Tips: रात्री जर तुम्हाला अजिबात शांत झोप येत नसेल तर हे काही बरं लक्षण नाही...(If you wake up multiple times from sleep in night you may have 3 health problems)

If you wake up multiple times from sleep in night you may have 3 health problems, what are the reasons for restless sleep in night? | रात्री सारखी जाग येऊन सतत झोपमोड होते, जाग येते? ३ आजारांचा धोका- शरीर काय सांगतंय ऐका..

रात्री सारखी जाग येऊन सतत झोपमोड होते, जाग येते? ३ आजारांचा धोका- शरीर काय सांगतंय ऐका..

Highlightsआरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांमुळे हा त्रास होऊ शकतो. त्या समस्या वेळीच जाणून त्यावर तातडीने उपाय करावा.

आरोग्याच्या कित्येक समस्या कमी करायच्या असतील तर रात्रीची झोप पुर्ण आणि शांत होणं खूप गरजेचं आहे. पण हल्ली झोप लवकर न येणं किंवा झोप आली तरी ती वारंवार मोडणं हा त्रास अनेकांना होतो. वारंवार झाेपमोड होत असेल तर त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. सतत अशी अपूरी झोप होत असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळीही अजिबातच फ्रेश वाटत नाही. कोणत्याही कामात उत्साह नसतो. खूप आळस येतो. कधीतरीच असं होत असेल तर ते एकवेळ समजू शकतं. पण झोपेचा असा त्रास तुम्हाला रोजच होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेणं खूप गरजेचं आहे (If you wake up multiple times from sleep in night you may have 3 health problems). कारण आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांमुळे हा त्रास होऊ शकतो. त्या समस्या वेळीच जाणून त्यावर तातडीने उपाय करावा.(what are the reasons for restless sleep in night?)

 

वारंवार झोपमोड होण्यामागे काय कारणं असू शकतात?

१. तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस असेल, एन्झायटीचा त्रास होत असेल तर तुमची सारखी झोपमोड होऊ शकते. हे त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा प्राणायाम, ध्यान करावे.

प्रत्येक महिलेने रोज खायलाच पाहिजेत 'हे' पदार्थ, चाळिशीनंतरही राहाल तरुण, निरोगी- दिसाल सुंदर

२. अनेकदा महिलांच्या बाबतीत असं दिसून येतं की जेव्हा त्यांची मासिक पाळी जवळ येते तेव्हा शरीरात हार्मोनल बदल होतात. त्या बदलांमुळेही पाळीच्या आसपासच्या दिवसांमध्ये महिलांना शांत झोप येत नाही.

 

मेनोपॉजच्या जवळपास असणाऱ्या महिलांनाही हा त्रास होतो. अशावेळी शरीरातले हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी नेमके काय उपाय करावे, याविषयी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

वटपौर्णिमा: १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या कांजीवरम स्टाईल सॉफ्ट सिल्क साडी- स्वस्तात मस्त 

३. ज्यांना पित्ताचा खूप त्रास असतो, अस्थमा, दमा किंवा किडनीचा त्रास असणाऱ्यांनाही वारंवार झोपमोड होण्याचा त्रास होतो अशी डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी सांगितलेली माहिती इंडियन एक्सप्रेस ग्रुपने दिली आहे. तुम्हाला या आजारांची इतर काही लक्षणंही दिसत असतील तर त्याविषयीही डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं.. 
 

Web Title: If you wake up multiple times from sleep in night you may have 3 health problems, what are the reasons for restless sleep in night?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.