Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लघवीतले ‘हे’ ४ बदल सांगतात किडनीच्या आजाराची लक्षणं, पाहा तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना...

लघवीतले ‘हे’ ४ बदल सांगतात किडनीच्या आजाराची लक्षणं, पाहा तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना...

If You See These 4 Signs In Your Urine Then Understand That Your Kidney Is Not Working Properly : 4 Signs You May Have Kidney Disease : How your pee can reveal if your kidneys are not working well : Warning Signs of Kidney Problems : लघवीतील बदल हे फक्त एक लक्षण नाही, तर आरोग्याबाबत दिला जाणारा एक महत्वाचा इशारा असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 16:40 IST2025-05-20T15:28:32+5:302025-05-20T16:40:13+5:30

If You See These 4 Signs In Your Urine Then Understand That Your Kidney Is Not Working Properly : 4 Signs You May Have Kidney Disease : How your pee can reveal if your kidneys are not working well : Warning Signs of Kidney Problems : लघवीतील बदल हे फक्त एक लक्षण नाही, तर आरोग्याबाबत दिला जाणारा एक महत्वाचा इशारा असतो.

If You See These 4 Signs In Your Urine Then Understand That Your Kidney Is Not Working Properly Warning Signs of Kidney Problems 4 Signs You May Have Kidney Disease | लघवीतले ‘हे’ ४ बदल सांगतात किडनीच्या आजाराची लक्षणं, पाहा तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना...

लघवीतले ‘हे’ ४ बदल सांगतात किडनीच्या आजाराची लक्षणं, पाहा तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना...

किडनी (मूत्रपिंड) हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. किडनी रक्तातील घाण आणि अपायकारक पदार्थ गाळून शरीरातून बाहेर टाकण्याचं मुख्य (If You See These 4 Signs In Your Urine Then Understand That Your Kidney Is Not Working Properly) काम करते. यासोबतच, रक्त शुद्ध करणं, शरीरातील पाणी आणि मीठाचं संतुलन राखणं अशी अनेक इतर महत्वाची कामं देखील किडनीच्या मदतीने ( How your pee can reveal if your kidneys are not working well) केली जातात. असे असले तरी जेव्हा किडनी (4 Signs You May Have Kidney Disease) नीट काम करणं थांबवत, तेव्हा त्याचे संकेत आपल्या शरीरात दिसू लागतात, यातील काही लक्षणं थेट आपल्या लघवीतून समजतात(Warning Signs of Kidney Problems).

लघवीचे रंग, वास, प्रमाण किंवा वारंवारता बदलली तर तो एक गंभीर इशारा असू शकतो. लघवीत अचानक होणारे असे बदल आपल्या किडनीचे आरोग्य नेमके कसे आहे, हे सांगतात. लघवी ही आरोग्याचा आरसा मानली जाते आणि त्यामधील थोडासाही बदल दुर्लक्ष करण्यासारखा नसतो. लघवीतील बदल हे फक्त एक लक्षण नाही, तर आरोग्याबाबत दिला जाणारा एक महत्वाचा इशारा असतो. आपण अशा चार महत्वाच्या लक्षणांची माहिती घेणार आहोत, जी लघवीमध्ये दिसल्यास किडनीच्या आरोग्यासाठी धोका असू शकतो. वेळेत ओळखल्यास आणि योग्य तपासणी करून घेतल्यास मोठा धोका टाळता येऊ शकतो, ही लक्षणं नेमकी कोणती ते पाहूयात.. 

किडनी खराब होण्याची ४ लक्षण कोणती ?

१. लघवीमध्ये फेस येणे :- लघवी करताना जर आपल्याला त्यात वारंवार फेस (बुडबुडे) तयार होताना दिसत असतील, तर हे एक धोक्याचं लक्षण असू शकतं. बहुतांश वेळा याकडे दुर्लक्ष केलं जातं, पण प्रत्यक्षात हे किडनी नीट काम करत नसल्याच्या संकेतापैकी एक आहे. जेव्हा किडनी कमजोर होऊ लागते, तेव्हा ती आपल्या मूळ कार्यात कमी पडते म्हणजेच रक्तातील आवश्यक प्रथिनं गाळून न टाकता ती लघवीत मिसळू लागतात. या स्थितीला प्रोटीन्युरिया (Proteinuria) असे म्हटले जाते. प्रथिनं लघवीत मिसळल्यामुळे तिचा पोत बदलतो आणि लघवी फेसाळ दिसू लागते. लघवी फेसाळ वाटत असेल, तर ते केवळ साधं लक्षण नाही तर ते किडनीच्या आजाराचा गंभीर इशारा असू शकतो. याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. 

रात्री वारंवार लघवीला उठावे लागते, झोपमोड होते ? डॉक्टर सांगतात ४ उपाय, झोप लागेल शांत...

२. लघवीच्या रंगात बदल :- जर किडनीने व्यवस्थित काम करणे थांबवले तर लघवीचा रंग बदलू शकतो. लघवीचा रंग हा आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा आरसा असतो. सामान्यपणे लघवी फिकट पिवळ्या रंगाची असते, पण किडनीने योग्यरीत्या काम करणं थांबवलं, तर लघवीचा रंग गडद पिवळा, नारिंगी किंवा तपकिरी होऊ शकतो. हा बदल अनेकदा किडनी निकामी होण्याचा इशारा असतो. काहीवेळा लघवीमध्ये रक्तदेखील दिसू शकतो, ज्यामुळे ती गुलाबी किंवा लालसर दिसते. यामागे किडनीला झालेला संसर्ग (इन्फेक्शन), किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे), किंवा इतर काही गंभीर कारणं असू शकतात.

३. वारंवार लघवी होणे :- जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल, विशेषतः रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक जाणवत असेल, तर ही गोष्ट दुर्लक्षित करू नये. हे  किडनी नीट कार्य करत नसल्याचं लक्षण असू शकतं. जेव्हा किडनी योग्य प्रकारे काम करत नाही, तेव्हा शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यात अडथळा येतो. त्यामुळे हे घातक पदार्थ शरीरात साचू लागतात आणि त्यांना बाहेर टाकण्यासाठी वारंवार लघवी होऊ लागते. तसेच, अशा प्रकारची लघवीची वाढ कधी कधी लघवीच्या मार्गातील संसर्गाचे (UTI) लक्षण देखील असू शकते. त्यामुळे वारंवार लघवी होत असल्यास, विशेषतः जर त्यासोबत जळजळ, वेदना किंवा थकवा जाणवत असेल, तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

बारीक होणं महत्वाचं नाही, आरोग्य जपणं-फिट असणं महत्वाचं! साेनाली कुलकर्णी सांगते, ट्रेंडच्या नादी लागून...

४. लघवीतून दुर्गंधी येणे :- सामान्यतः लघवीला सौम्य वास असतो, पण जर तीव्र किंवा दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला, तर ते मूत्रपिंड नीट काम करत नसल्याचा  संकेत असू शकतो. शरीरातले विषारी पदार्थ किडनीच्या मदतीने लघवीतून बाहेर टाकले जातात. मात्र जेव्हा किडनी योग्यरीत्या कार्य करत नाही, तेव्हा हे विषारी घटक नीट फिल्टर न होता लघवीत राहतात, त्यामुळे लघवीला तिखट, अमोनियासारखा किंवा दुर्गंधीयुक्त वास येऊ लागतो. कधीकधी असा वास मूत्रमार्गातील संसर्ग (UTI) किंवा किडनीच्या संक्रमणाचंही लक्षण असू शकतो. त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

Web Title: If You See These 4 Signs In Your Urine Then Understand That Your Kidney Is Not Working Properly Warning Signs of Kidney Problems 4 Signs You May Have Kidney Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.