Join us

किडनी स्टोन झाल्यास पालक आणि टोमॅटो एकत्र खाणं घातक,आहारतज्ज्ञ सांगतात एक महत्वाचा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:44 IST

Kidney Stone : न्यूट्रिशनिस्ट रिता जैन यांनी सल्ला दिला आहे की, जर तुम्हाला किडनी स्टोन असेल, तर पालक आणि टोमॅटो एकत्र खाणं घातक ठरू शकतं.

Kidney Stone : किडनी स्टोनचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. कारण किडनी स्टोनच्या वेदना इतक्या असह्य असतात की, त्या कुणीही विसरू शकत नाही. ही एक अशी समस्या आहे जी कुणालाही होऊ शकते. इतकंच नाही तर एकदा ही समस्या झाल्यावर पुन्हा पुन्हा होण्याचा धोकाही असतो. जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल किंवा आधी होऊन गेली असेल तर आहार यात महत्वाची भूमिका निभावतो.

अनेकांना हे माहीत नसतं की, ज्या भाज्यांना आपण नेहमीच खातो आणि हेल्दी मानतो त्या दोन भाज्या किडनी स्टोनची समस्या अधिक वाढवू शकतात. न्यूट्रिशनिस्ट रिता जैन यांनी सल्ला दिला आहे की, जर तुम्हाला किडनी स्टोन असेल, तर पालक आणि टोमॅटो एकत्र खाणं घातक ठरू शकतं.

काय आहे कारण?

पालक आणि टोमॅटोमध्ये ऑक्सालेट भरपूर प्रमाणात असतात. ऑक्सालेट असे एंझाइम असतात, जे शरीरात कॅल्शिअमसोबत मिळून ऑक्सालेट क्रिस्टल तयार करतात. जेव्हा हे क्रिस्टल जास्त प्रमाणात तयार होतात, तेव्हा ते किडनीमध्ये जमा होऊन स्टोनचं रूप घेतात.

जेव्हा तुम्ही पालक आणि टोमॅटो एकत्र खाता, तेव्हा दोन्हींमधील ऑक्सालेटचं प्रमाण अधिक वाढतं. अशात कॅल्शिअम ऑक्सालेट क्रिस्टल बनवण्याची शक्यता अनेक पटीनं वाढते, जे थेटपणे किडनी स्टोनचं एक मोठं कारण आहे.

किडनी स्टोन असेल तर काय कराल?

जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल किंवा याची फॅमिली हिस्ट्री असेल तर काही गोष्टींची खूप जास्त काळजी घ्यावी लागते.

पालक-टोमॅटो टाळा

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, पालक-टोमॅटोसोबतच बीट, चॉकलेट, नट्स आणि चहामध्येही ऑक्सालेट असतं, त्यामुळे या गोष्टी सुद्धा कमी खाव्यात.

भरपूर पाणी प्या

किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणं गरजेचं असतं. पाण्यानं किडनीमध्ये जमा होणारे मिनरल्स बाहेर पडतात आणि स्टोन तयार होण्याचा धोका टाळला जातो.

मीठ कमी खा

जास्त मीठ खाल्ल्यानं लघवीमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे किडनीमध्ये स्टोन तयार होण्याचा धोका अधिक वाढतो.

प्लांट प्रोटीन कमी घ्या

मटण, चिकन आणि मासे जास्त खाल्ल्यानंही किडनी स्टोनचा धोका वाढतो.

व्हिटामिन सी सुद्धा कमी घ्या

काही लोकांमध्ये व्हिटामिन सी फार जास्त प्रमाणात इनटेक केल्यानं ऑक्सालेटचं प्रमाण वाढू शकतं.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स