Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अक्कल दाढ काहीच कामाची नसते, मग असह्य वेदना देणारी ही दाढ येते कशाला? अकलेचा संबंध असतो की..

अक्कल दाढ काहीच कामाची नसते, मग असह्य वेदना देणारी ही दाढ येते कशाला? अकलेचा संबंध असतो की..

Wisdom Teeth Facts : बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात की, अक्कल दाढीचं काही काम असतं की नसतं? जर काही काम नसेल तर ती कशासाठी येते? तेच समजून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:11 IST2026-03-04T12:03:23+5:302026-03-04T14:11:48+5:30

Wisdom Teeth Facts : बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात की, अक्कल दाढीचं काही काम असतं की नसतं? जर काही काम नसेल तर ती कशासाठी येते? तेच समजून घेऊया.

If wisdom teeth useless then why are they in the mouth? Know the facts | अक्कल दाढ काहीच कामाची नसते, मग असह्य वेदना देणारी ही दाढ येते कशाला? अकलेचा संबंध असतो की..

अक्कल दाढ काहीच कामाची नसते, मग असह्य वेदना देणारी ही दाढ येते कशाला? अकलेचा संबंध असतो की..

Wisdom Teeth Facts : अक्कल दाढ ही नेहमीच चर्चेचा विषय असते. गंमतीने बरेच लोक असं म्हणतात की, अक्कल दाढ असेल त्याला जास्त अक्कल असते. पण असं काही नाहीये. मुळात अक्कल दाढ ही दातांच्या सगळ्यात शेवटी निघते. मेडिकल भाषेत याला 'थर्ड मोलर' म्हणतात. सामान्यपणे १७ ते २५ वयादरम्यान ही दाढ येते. हा दात इतर दातांच्या तुलनेत उशिरा येत असल्याने याला 'विजडम टीश' असंही म्हणतात.

काही लोकांमध्ये अक्कल गाढ योग्य त्या जागेवर येते, त्यामुळे अशा लोकांना पुढे जाऊन काहीच त्रास होत नाही. पण अनेकदा जबड्यामध्ये जागा कमी पडल्याने अक्कल दाढ हिरडीमध्ये किंवा हड्डीमध्ये अडकते. अशात असह्य वेदना, सूज, इन्फेक्शन, किड किंवा हिरड्यांच्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टर अनेकदा अक्कल दाढ काढण्याचा सल्ला देतात. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात की, अक्कल दाढीचं काही काम असतं की नसतं? जर काही काम नसेल तर ती कशासाठी येते? तेच समजून घेऊया.

अक्कल दाढेचं काम काय? 

जर अक्कल दाढ इतका असह्य वेदना देते, तर याचं काम तरी काय? तर मुळात विषय असा आहे की, आपल्या पूर्वजांचं खाणं-पिणं आजपेक्षा खूप वेगळं होतं. ते पाला-पाचोळा, कठोर ड्राय फ्रूट्स आणि कच्च किंवा वाळलेलं मांस खात होते. अशा गोष्टी चांगल्या चावण्यासाठी जबड्याच्या मागे अतिरिक्त दातांची गरज पडत होती. अक्कल दाढ हीच गरज पूर्ण करत होती. त्यावेळी जबडे आत्ताच्या तुलनेत मोठे होते, त्यामुळे या दातासाठी एक्स्ट्रा जागाही राहत होती.

Cleveland Clinic वेबसाईटनुसार, जसजसा काळ बदलला आपलं अन्न मुलायम आणि शिजवलेलं झालं. खाण्याची पद्धत बदलली आणि त्यानुसार आपल्या शरीरातही काही बदल झाले. जबडे लहान झाले आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्या तोंडात अक्कल दाढेसाठी पुरेशी जागा शिल्लक राहत नाही. हेच कारण आहे की, हा दात अनेकदा त्रासाचं कारण ठरतो. त्याशिवाय आज यांचं काही काम राहत नाही, त्यामुळे बरेच लोक ही दाढ काढतात. 

अक्कल दाढीचे प्रकार 

सामान्यपणे मनुष्यांना चार अक्कल दाढी असतात. वर आणि खाली दोन दोन असतात. पण प्रत्येकाला चार अक्कल दाढी येतीलच असंही नाही. काही लोकांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त दात येतच नाही. ही बाब सामान्य आहे. यांचा आकार आणि मुळाची बनावट व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते. जर अक्कल दाढ योग्य पद्धतीने येत असेल आणि काहीच त्रास होत नसेल, तर ते काढण्याची गरज पडत नाही. पण जर वेदना होत असेल किंवा इन्फेक्शन होत असेल तर डेंटिंस्टच्या सल्ल्याने अक्कल दाढ काढू शकता. 

Web Title : अक्ल दाढ़: दर्दनाक और बेकार? उनका उद्देश्य और प्रकार समझना।

Web Summary : अक्ल दाढ़, जीवन में बाद में उभरती है, अक्सर जबड़े की जगह सीमित होने के कारण दर्द का कारण बनती है। वे अतीत में सख्त खाद्य पदार्थों को चबाने के लिए महत्वपूर्ण थे, लेकिन आधुनिक आहार ने उनकी आवश्यकता को कम कर दिया है। हर किसी को सभी चार नहीं मिलते; यदि समस्याएँ उत्पन्न होती हैं तो हटाने की सलाह दी जाती है।

Web Title : Wisdom teeth: Painful and useless? Understanding their purpose and types.

Web Summary : Wisdom teeth, emerging later in life, often cause pain due to limited jaw space. They were crucial for chewing tough foods in the past, but modern diets have diminished their necessity. Not everyone gets all four; removal is advised if problems arise.