Join us

सावधान! रोज डोकं दुखतं? दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर; 'या' ५ गंभीर आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:19 IST

कधीकधी डोकेदुखी सौम्य आणि सामान्य असते, परंतु जर वेदना कायम राहिल्या आणि दररोज सारखं सारखं डोकं दुखत राहिलं तर ते आरोग्यासाठी गंभीर असू शकतं.

डोकेदुखी ही आता गंभीर समस्या राहिलेली नाही. दररोज एक ना एक व्यक्ती डोकेदुखीची तक्रार करत असल्याचं आढळून येतं. कधीकधी डोकेदुखी सौम्य आणि सामान्य असते, परंतु जर वेदना कायम राहिल्या आणि दररोज सारखं सारखं डोकं दुखत राहिलं तर ते आरोग्यासाठी गंभीर असू शकतं.

वारंवार डोकं दुखणं हे केवळ ताणतणाव किंवा थकव्यामुळे होऊ शकत नाही, तर ते काही गंभीर आजारांचं लक्षण देखील असू शकतं, जे वेळेवर उपचार न केल्यास घातक देखील ठरू शकतात.-

मायग्रेन

मायग्रेन ही एक प्रकारचीी डोकेदुखी आहे, जी सामान्य वेदनेपेक्षा खूपच तीव्र असते. यामुळे डोक्याच्या एका भागात तीव्र वेदना, मळमळ, उलट्या यासारख्या समस्या उद्भवतात. जर तुम्हालाही ही लक्षणं जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण हा आजार कालांतराने अधिक गंभीर होऊ शकतो.

हाय ब्लडप्रेशर

हाय ब्लडप्रेशरमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे त्यावर त्वरित नियंत्रण मिळवणं महत्त्वाचं आहे.

इन्फेक्शन

कधीकधी डोकेदुखी ही सायनस किंवा ब्रेन इन्फेक्शनचं लक्षण असते. या परिस्थितीत, डोक्याच्या पुढच्या भागात वेदना होतात आणि सर्दी, खोकला आणि ताप यासारखी लक्षणं देखील दिसू शकतात.

टेन्शन

डोकेदुखी ही टेन्शनमुळे होते. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले असाल किंवा तणावपूर्ण परिस्थितीतून जात असाल तर डोकेदुखी वारंवार होऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नये.

ब्रेन ट्यूमर

ब्रेन ट्यूमर हे देखील वारंवार आणि सतत होणाऱ्या डोकेदुखीचं एक कारण आहे. ही एक गंभीर स्थिती आहे आणि वेळेवर उपचार न केल्यास ती जीवघेणी ठरू शकते. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य