Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > घामाला अती तीव्र दुर्गंधी येत असेल तर डिओ मारून दुर्लक्ष करू नका, हा घाम साधा नाही..

घामाला अती तीव्र दुर्गंधी येत असेल तर डिओ मारून दुर्लक्ष करू नका, हा घाम साधा नाही..

If sweat has a very strong smell, don't ignore it , this sweat is not normal : घामाला वास येत असेल तर त्यावर वेळीच उपाय करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 11:05 IST2026-02-02T11:03:55+5:302026-02-02T11:05:51+5:30

If sweat has a very strong smell, don't ignore it , this sweat is not normal : घामाला वास येत असेल तर त्यावर वेळीच उपाय करा.

If sweat has a very strong smell, don't ignore it , this sweat is not normal. | घामाला अती तीव्र दुर्गंधी येत असेल तर डिओ मारून दुर्लक्ष करू नका, हा घाम साधा नाही..

घामाला अती तीव्र दुर्गंधी येत असेल तर डिओ मारून दुर्लक्ष करू नका, हा घाम साधा नाही..

घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येतो आणि त्याला विशिष्ट वास नसतो. मात्र घामासोबत विशिष्ट वास येणे, त्वचेवर खाज येणे किंवा अंगाला दाह जाणवणे ही लक्षणे दिसू लागली, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. (If sweat has a very strong smell, don't ignore it , this sweat is not normal.)ही समस्या वैयक्तिक स्वच्छता, त्वचेची स्थिती, बुरशीजन्य संसर्ग किंवा जीवनशैलीशी संबंधित असू शकते.

घामाचा वास मुख्यतः त्वचेवर असलेल्या जिवाणूंमुळे येतो. घाम येतो तेव्हा तो ओलसरपणा निर्माण करतो आणि त्या ओलसर जागेत जिवाणू झपाट्याने वाढतात. विशेषतः काख, जांघे, मांड्या, पायांची बोटे, नाभीभोवतालचा भाग या ठिकाणी हवा कमी पोहोचत असल्यामुळे वास आणि खाज दोन्ही समस्या वाढतात. जास्त वेळ ओले कपडे घालणे, घट्ट कपडे, कृत्रिम कापड आणि सततचा अंगावर सुकणारा घाम  ही कारणे समस्या गंभीर करतात.

कधी-कधी घामाला येणारा तीव्र वास हा बुरशीजन्य किंवा जंतुसंसर्गाचे लक्षण असू शकतो. अशा वेळी खाज, लालसरपणा, पुरळ, त्वचा सोलटणे किंवा पांढरट थर दिसू शकतो. मधुमेह, लठ्ठपणा, हार्मोन्समधील बदल, जास्त ताणतणाव आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असणे यामुळेही ही समस्या वाढू शकते. या त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. रोज आंघोळ करणे, घाम येणारे भाग नीट स्वच्छ करून कोरडे ठेवणे गरजेचे आहे. आंघोळीच्या वेळी सौम्य, त्वचेला अनुरुप साबण वापरावा. आंघोळीनंतर त्वचा पूर्णपणे कोरडी करुनच कपडे घालावेत, कारण ओलसर त्वचेमुळे बुरशी वाढण्याचा धोका वाढतो.

कपड्यांची निवडही खूप महत्त्वाची आहे. सुती आणि सैल कपडे घालावेत, जेणेकरुन त्वचेला हवा मिळेल. घट्ट जीन्स, सिंथेटिक कपडे किंवा आत घालायचे कपडे सतत ओले राहत असतील तर ते लगेच बदलणे आवश्यक आहे. मोजे रोज बदलावेत आणि पाय स्वच्छ व कोरडे ठेवावेत. घरगुती उपाय म्हणून कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ करणे, किंवा खाज येणाऱ्या भागावर रस लावणे, कोरफड किंवा नारळाच्या तेलाचा वापर केल्यास आराम मिळू शकतो. काही वेळा चिमूटभर हळद नारळाच्या तेलात मिसळून लावल्यास बुरशीजन्य संसर्ग कमी होण्यास मदत होते. मात्र खूप खाज, जळजळ किंवा जखमा असल्यास घरगुती उपायांवरच अवलंबून राहू नये.

खाण्यापिण्यात बदल करणेही उपयुक्त ठरते. फार मसालेदार, तिखट, तेलकट अन्न, तसेच जास्त प्रमाणात कांदा, लसूण आणि मद्यपान केल्यास घामाचा वास वाढू शकतो. भरपूर पाणी पिणे, फळे, भाज्या आणि फायबरयुक्त आहार घेणे शरीर डिटॉक्स ठेवण्यास मदत करते.
 

Web Title : तेज़ गंध वाला पसीना? इसे नज़रअंदाज़ न करें; यह सामान्य नहीं है।

Web Summary : खुजली के साथ तेज़ गंध वाला पसीना संक्रमण या जीवनशैली की समस्याओं का संकेत दे सकता है। स्वच्छता बनाए रखें, हवा पार होने वाले कपड़े पहनें, और आहार में बदलाव पर विचार करें। लगातार समस्याओं के लिए डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Strong-smelling sweat? Don't ignore it; it's not normal sweat.

Web Summary : Strong-smelling sweat with itching may indicate infection or lifestyle issues. Maintain hygiene, wear breathable clothes, and consider dietary changes. Consult a doctor for persistent problems.