आपल्यापैकी काहीजणांच्या घरातच डायबिटीस असतो. काही आजार असे असतात जे अगदी वंशपरंपरागत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देखील एखाद्या वारसा हक्काप्रमाणेच दिले जातात. डायबिटीस (If parents have diabetes, teach children these 4 habits to prevent future risk) हा त्यापैकीच एक आजार. आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरात आजी - आजोबा, आई - बाबा यांना डायबिटीस असते, अशा घरातील पुढच्या पिढीला देखील डायबिटीस (Diabetes Management) होण्याची दाट शक्यता असते. जर घरातील आई-वडिलांना डायबेटीस असेल, तर तो पुढे मुलांना देखील होण्याची शक्यता असते अशावेळी डायबिटीस होऊ नये यासाठी वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. डायबिटीस फक्त चुकीच्या जीवनशैलीमुळेच नव्हे, तर वंशपरंपरेमुळे देखील होऊ शकतो(When elders have diabetes, make sure your kids follow these 4 daily routines).
जर आपल्या घरात आई-वडिलांना डायबिटीस असेल, तर पुढच्या पिढीला देखील हा धोका असतो. परंतु काळजी न करता वेळीच योग्य सवयी स्वतःला लावून घेतल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर सिद्धांत भार्गव यांनी अशाच ४ महत्वाच्या सवयी सांगितल्या आहेत, ज्या आपण आपल्या डेली रुटीनमध्ये फॉलो केल्या तर वंशपरंपरागत होणाऱ्या डायबिटीसचा धोका कमी करता येऊ शकतो. याचबरोबर, शरीरातील ब्लड शुगर देखील नियंत्रणात ठेवता येतो. घरात जर सगळ्यांनाच डायबिटीस असेल तर पुढच्या पिढीला होऊ नये यासाठी काय नियम पाळावेत ते पाहा..
डायबिटीस वंशपरंपरागत असेल तर पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून...
१. चपाती - भातापेक्षा 'हे' पदार्थ खा :- डॉ. भार्गव यांच्यानुसार, डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात सर्वप्रथम भरडधान्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. डॉक्टर सांगतात, चपाती आणि भात खाण्याऐवजी बाजरी, ज्वारीसारखी भरडधान्यं अधिक प्रमाणात खा. भरडधान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो, त्यामुळे ते हळूहळू पचतात आणि रक्तातील साखर अचानक वाढू देत नाहीत. त्याउलट भात, मैदा आणि रिफाइन्ड धान्यं लवकर पचतात आणि त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढते. त्यामुळे, जर घरात डायबिटीस वंश परंपरागत असेल, तर चपाती ऐवजी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खाऊ शकता. हा उपाय केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते आणि आरोग्य चांगलं राखता येतं.
गर्भधारणेसाठी फर्टिलिटी मसाजचा उपाय, डॉक्टर सांगतात ‘असा’ मसाज करणार असाल तर काय माहिती हवंच...
२. गोड खायची इच्छा झाली तर काय कराल :- अनेकांना गोड पदार्थ खायला फार आवडतात. परंतु डायबिटीस असताना गोड खाणं रक्तातील साखर वाढवू शकतं. डॉक्टर सिद्धांत भार्गव यांच्या मते, ठराविक वेळा गोड खाल्लं तर हरकत नाही, पण ते योग्य पद्धतीने खाणं महत्त्वाचं आहे. शक्यतो गोड खाताना पोट भरलेलं असतानाच गोड खा, पण रिकाम्या पोटी गोड खाणं टाळा. गोड खाण्यापूर्वी फायबरयुक्त पदार्थ खा, कारण फायबर पचनक्रिया मंद करतो, त्यामुळे साखर शरीरात लगेच शोषली जात नाही. यामुळे ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढत नाही आणि गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते, याचबरोबर शरीरावर ताण येत नाही.
मुलांच्या लहरीवर आईबाबाही स्वार! पाहा जेलीफिश पॅरेण्टिंगचा नवाच ट्रेंड- मुलांसाठी पोषक की घातक...
३. फक्त कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थच खाण्यावर भर देऊ नका :- डॉ. भार्गव यांच्या सल्ल्यानुसार, डायबिटीस असलेल्या रुग्णांनी फक्त कार्बोहायड्रेट्सवर अवलंबून राहू नये. कार्ब्ससोबत प्रोटीनचा समावेश करणे तितकेच आवश्यक आहे. दही,पनीर, अंडी, चिकन यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थ घेतल्याने पचनक्रियेचा वेग मंदावतो आणि त्यामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढत नाही. यासाठीच रोजच्या जेवणात संतुलित प्रमाणात कार्ब्स आणि प्रोटीन असणं आरोग्यदृष्ट्या उपयुक्त ठरते, विशेषतः डायबेटीस नियंत्रणासाठी हे फायदेशीर ठरते.
४. जेवणानंतर वॉकिंग करायला विसरू नका :- या सगळ्यांबरोबरच डॉ. भार्गव जेवल्यानंतर वॉक करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगतात.त्यांच्या मते, केवळ १५ मिनिटांचा हलका वॉक देखील शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. यामुळे जेवलेलं अन्न योग्यरीत्या पचतं, ब्लड शुगर नियंत्रणात राहते.