पाणी घटाघटा पिऊ नका किंवा उभ्याने पाणी पिऊ नये ही वाक्ये आठवतात का? आई- आजी कायम असे म्हणतात. जाऊ दे म्हणून आपण सोडून देतो. मात्र चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्यासाठी फार धोक्याचे. घाईगडबड असल्यामुळे आपण अनेकदा थांबून पाणी पित नाही. (How you drink water? there are some mistakes you must avoid , especially children should never do 'these' things)पटापट एकदाच पितो. उभ्याने, गटागट, आणि अनेकदा भांड्याला तोंड न लावता वरतून पाणी पिण्याची सवय सर्व वयोगटांतील लोकांना असते. पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरते, विशेषतः लहान मुलांसाठी. भांडं उष्टं होऊ नये म्हणून पाणी वरतून पितात. मात्र त्यामुळे शरीराला त्रास होतो.
जेव्हा आपण उभ्याने गटागट पाणी पितो, तेव्हा पाणी थेट घशातून खाली पोटात जाते आणि शरीराला ते योग्यरीत्या शोषून घेण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे पोटातील आम्लपित्त वाढते, आणि पचनावर ताण येतो. शरीरातील द्रव्यांचे संतुलन बिघडते, तसेच किडनीवर अचानक दाब तयार होतो. कारण पाणी झपाट्याने शरीरात फिरते. या सवयीमुळे सांधे दुखणे, गॅस, आम्लपित्त आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या वाढू शकतात.
लहान मुलांची पचनसंस्था अजून विकसित होत असते. त्यामुळे उभ्याने किंवा गटागट पाणी पिण्याने त्यांना पोटात दुखणे, उलट्या, अपचन, पोट फुगणे असे त्रास उद्भवतात. मुलांना ही सवय लागू दिल्यास ती नंतर बदलणे कठीण जाते. त्यामुळे पालकांनी विशेष काळजी घ्यावी.
याशिवाय, अनेक जण भांड्याला तोंड न लावता थेट बाटलीतून पाणी पितात. हे hygienic वाटले तरी प्रत्यक्षात तोंडातील जीवाणू बाटलीच्या तोंडावर राहतात आणि पुढच्या वेळी त्याच बाटलीतून पाणी घेतल्यास हे जंतू पुन्हा शरीरात जातात. त्यामुळे तोंड, घसा आणि पचनसंस्थेचे आजार होऊ शकतात.
पाणी बसून आणि हळूहळू पिणे ही सर्वोत्तम पद्धत आहे. बसल्यावर शरीर शांत अवस्थेत असते आणि पाणी शरीरभर योग्य रीतीने शोषले जाते. पाणी चघळल्यासारखे हळू प्यायल्याने ते लाळेत मिसळते, ज्यामुळे पचन सुधारते आणि आम्लपित्त कमी होते. अशा प्रकारे प्यायलेले पाणी शरीराला अधिक ऊर्जा आणि तजेलता देते. म्हणूनच, उभ्याने गटागट पाणी पिण्याची सवय टाळा. मुलांना लहानपणापासूनच पाणी बसून, शांतपणे आणि हळूहळू पिण्याची सवय लावा. ही साधी सवय आयुष्यभर पचनसंस्था आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.