Join us

शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कसा खावा? डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:04 IST

High Cholesterol : आयुर्वेदात लसणाला खूप महत्वाचं मानलं जातं. शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही लसणाचा उपाय करू शकता. 

High Cholesterol : आजकाल जास्तीत जास्त लोक वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे हैराण आहेत. कोलेस्टेरॉल वाढलं की, आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. त्यात सगळ्यात जास्त गंभीर म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका. ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा जीव जात आहे. तुम्हाला सुद्धा जीवाचा धोका टाळायचा असेल तर औषधांसोबत काही आयुर्वेदिक उपायही करू शकता. आयुर्वेदात लसणाला खूप महत्वाचं मानलं जातं. शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही लसणाचा उपाय करू शकता. 

लसणाच्या मदतीनं कोलेस्टेरॉल कसं कमी होतं, याबाबत आयुर्वेद डॉक्टर चैताली राठोड यांनी एका व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, बऱ्याच लोकांना लसणाचा योग्य वापर कसा करायचा हे माहीत नसतं. डॉक्टरांनी सांगितलं की, लसूण कधी अख्खा गिळायचा नसतो किंवा भाजीतही तो अख्खा टाकू नये.

आयुर्वेदानुसार लसण खाण्याची योग्य पद्धत

डॉक्टरांनी सांगितलं की, लसण कधीच अख्खा खाऊ नये किंवा गिळू नये. याच्या वापराची योग्य पद्धत याला बारीक करून किंवा कापून खाण्यात आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे यात आढळणारं तत्व एलिसिन आहे. ज्याला बारीक केल्यावरच याची शक्ती वाढते.

कोलेस्टेरॉल-कॅन्सर होईल दूर

एलिसिन लसणाची सगळ्यात मोठी ताकद आहे. ज्याने कोलेस्टेरॉल कमी करण्यास, हृदय निरोगी ठेवण्यास, कॅन्सरच्या कोशिकांसोबत लढण्यास, केस चांगले ठेवण्यात, हाय ब्लड प्रेशर मॅनेज करण्यास मदत मिळते.

एलिन ताज्या लसणामध्ये आढळणारं एक रसायन असतं आणि एलिसिनचं एक रूप आहे. लसूण कापल्याने किंवा बारीक केल्याने एलिन नावाचं एंजाइम सक्रिय होतं. 

आयुर्वेदात लसणाला रसोना किंवा लगुना म्हटलं जातं. जे एक महाऔषध मानलं जातं. याचे आरोग्याला होणारे फायदे बोटांवर मोजता येत नाहीत. शरीरातील अनेक समस्या लसणाच्या मदतीने दूर होऊ शकतात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स