Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हामुळे मुलं गळून गेली- जेवणही जात नाही? ३ उपाय करा- मलूल झालेली मुलंही होतील चटकन फ्रेश

उन्हामुळे मुलं गळून गेली- जेवणही जात नाही? ३ उपाय करा- मलूल झालेली मुलंही होतील चटकन फ्रेश

How To Take Care Of Kids In Summer: उन्हाचा पारा खूपच वाढला आहे. त्यामुळे लहान मुलांनाही त्याचा सध्या भयंकर त्रास होतो आहे. म्हणूनच मुलांचा त्रास कमी करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2024 01:49 PM2024-05-09T13:49:10+5:302024-05-09T18:14:33+5:30

How To Take Care Of Kids In Summer: उन्हाचा पारा खूपच वाढला आहे. त्यामुळे लहान मुलांनाही त्याचा सध्या भयंकर त्रास होतो आहे. म्हणूनच मुलांचा त्रास कमी करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा....

how to take care of kids in summer, 3 tips to avoid weakness in kids during summer | उन्हामुळे मुलं गळून गेली- जेवणही जात नाही? ३ उपाय करा- मलूल झालेली मुलंही होतील चटकन फ्रेश

उन्हामुळे मुलं गळून गेली- जेवणही जात नाही? ३ उपाय करा- मलूल झालेली मुलंही होतील चटकन फ्रेश

Highlights मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्यांची तब्येत  चांगली राहावी यासाठी या काही गोष्टी करून पाहा..

सध्या उन्हाचा कडाका सगळीकडेच खूप वाढला आहे. दुपारची वेळ असो किंवा रात्रीची वेळ असो... गरमी एवढी वाढलेली आहे की अंगाची नुसती लाहीलाही होते. मोठ्या माणसांनाच जिथे उन्हाचा एवढा त्रास होत आहे  तिथे लहान मुलांची तर गोष्टच वेगळी. म्हणूनच तर घरोघरची मुलं उन्हामुळे गळून गेलेली दिसत आहेत. विशेषत: जी मुलं ५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत, त्यांना तर उन्हाचा जरा जास्तच त्रास होत आहे. मुलांना धड जेवणही जात नाही. त्यामुळे ते सुकून गेले आहेत (how to take care of kids in summer). म्हणूनच मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्यांची तब्येत  चांगली राहावी यासाठी या काही गोष्टी करून पाहा.. (3 tips to avoid weakness in kids during summer)

 

मुलांना उन्हाचा त्रास होत आहे हे सांगणारी लक्षणं

१. मुलांचे वजन उतरणे

२. जेवणाचे प्रमाण कमी होणे.

हिमोग्लोबिन वाढतच नाही? ४ गारेगार ज्यूस प्या, अशक्तपणा जाईल- अंगातलं रक्त वाढून ताकद येईल

३. सतत चिडचिड करणे किंवा रडणे.

४. पोट दुखणं, जुलाब होणे.

५. दिवसभर सुस्ती येणे, दिवसा जास्त वेळ झोपणे..

 

मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून उपाय...

१. मुलांना खूप जेवणाचा आग्रह करू नका. आपल्यावरून त्यांची परिस्थिती लक्षात घ्या. त्यांना जेवढं जेवण जाईल तेवढंच द्या, पण आहारातले द्रव पदार्थ वाढवा. कोरडं कोरडं खायला देणं टाळा.

तुम्हीही वापरण्यापुर्वी केशर पाण्यात भिजत घालता? चुकताय- बघा स्वाद, सुगंधासाठी कसं वापरायचं केशर 

२. मुलांना फळं भरपूर खायला द्या. याशिवाय दिवसातून एकदा तरी ताक, लिंबू सरबत, पन्हं अशी सरबतं द्या. शिवाय ते भरपूर प्रमाणात पाणी पित आहेत की नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या.

३. मुलांना ताजं जेवण द्या... मसालेदार, तुपकट, तेलकट पदार्थ देणं टाळा. पॅकफूड, चिप्स असं काहीही देणं  टाळा. यामुळे पाणी पाणी जास्त होतं. 

 

Web Title: how to take care of kids in summer, 3 tips to avoid weakness in kids during summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.