Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मुलं वारंवार तोंडात बोट घालतात- अंगठा चोखतात? ३ सोपे उपाय - मुलांची सवय लगेच सुटेल..

मुलं वारंवार तोंडात बोट घालतात- अंगठा चोखतात? ३ सोपे उपाय - मुलांची सवय लगेच सुटेल..

Why do kids suck their thumb: Home tips to stop finger sucking in babies: आपलेही मुलं वाढत्या वयात सतत अंगठा चोखत असेल तर हे ३ सोपे उपाय करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2025 13:20 IST2025-07-24T13:00:53+5:302025-07-24T13:20:02+5:30

Why do kids suck their thumb: Home tips to stop finger sucking in babies: आपलेही मुलं वाढत्या वयात सतत अंगठा चोखत असेल तर हे ३ सोपे उपाय करुन पाहा.

How to stop thumb sucking in toddlers Simple remedies for kids sucking fingers Break thumb sucking habit in children | मुलं वारंवार तोंडात बोट घालतात- अंगठा चोखतात? ३ सोपे उपाय - मुलांची सवय लगेच सुटेल..

मुलं वारंवार तोंडात बोट घालतात- अंगठा चोखतात? ३ सोपे उपाय - मुलांची सवय लगेच सुटेल..

बाळ जन्माला आल्यानंतर जसं जसे ते मोठे होऊ लागते तसं तसे ते तोंडात बोट घालतात.(kids health) मुलांना वारंवार तोंडात बोट घालण्याची किंवा अंगठा चोखण्याची सवय सामान्य वाटते.(Why do kids suck their thumb) परंतु, ही सवय वाढत्या वयात देखील तशीच राहाते.(Home tips to stop finger sucking in babies) अनेकदा असं दिसून येते की मुलांना वारंवार अंगठा चोखण्याची सवय आहे. त्यामुळे पालक सतत त्यांच्यावर ओरडत राहतात. (Child thumb sucking solution at home)
बाळ लहान असताना तोंडात बोटे घालत असेल तर आपल्याला वाटते त्यांना भूक लागली आहे.(How to stop baby from sucking thumb naturally) मुले फक्त भूक लागली म्हणून बोटे चोखत नाहीत तर त्याची इतर कारणे देखील असू शकतात. जर आपलेही मुलं वाढत्या वयात सतत अंगठा चोखत असेल तर हे ३ सोपे उपाय करुन पाहा.(Finger sucking in kids – causes and solutions) 

बालरोगतज्ज्ञ डॉ. निमिषा अरोरा यांनी मुलांच्या अंगठा चोखण्याच्या सवयी कशा सोडवायच्या याविषयी सांगितलं आहे. त्या म्हणतात, सध्या मला अनेकजण प्रश्न विचारतात. मुलं सारखी अंगठा चोखतात, ही सवय कशी सोडवायची. पण प्रत्येक मूल नैसर्गिक शोषक प्रतिक्षेप घेऊन जन्माला येते. म्हणूनच पहिल्या वर्षभरात मुलांची अंगठा चोखण्याची सवय ही सामान्य असते. त्यांना स्वत:ला शांत करण्यासाठी किंवा सुरक्षित वाटण्यासाठीची ही प्रक्रिया असते. इतकेच नाही तर जसं जसे बाळ वाढू लागते तसं तसेच त्याच्या शारीरिक क्रियांमध्ये बदल होतात. दात येणे, हिरड्या सळसळणे किंवा कोणतही वस्तू दिसल्यावर तोंडात घालणे. अशावेळी बाळ साधरणत: तोडांत बोटे घालतात. मुले मोठी होऊ लागली की, त्यांची अंगठा चोखण्याची सवय हळूहळू जाते. पण मूल तीन वर्षांपेक्षा मोठे असेल आणि अजूनही अंगठा चोखत असेल तर अशा परिस्थितीत पालकांनी शांतपणे गोष्टी सांभाळायला हव्या. 

मेकअपपूर्वी मलायका अरोरा करते ४ गोष्टी, वयाच्या पन्नाशीतही दिसते कमाल सुंदर- तिचं खास रुटीन पाहा

1. पालकांनी मुलांच्या अंगठा चोखण्याच्या सवयींमध्ये व्यत्यय आणू नका. असं केल्याने मुले वारंवार अंगठा चोखत राहतात. अशावेळी त्यांना भूक लागली आहे का? काही हवं आहे का असं विचारा. ज्यामुळे आपल्याला त्याचे नेमके कारण कळेल. 

2. जर मुलांची दिवसभरातून अंगठा चोखण्याची सवय आपोआप कमी झाली तर त्यांचे कौतुक करा किंवा त्यांना बक्षीस द्या. त्यांना चॉकलेट, गोडाचे पदार्थ किंवा चिप्स देऊ नका. त्यांच्या सोबत खेळा, त्यांना विविध गोष्टी सांगून बक्षीस देऊ शकता. 


3. मुले जर अंगठा चोखत असतील तर त्यांना आठवण करुन द्या, आता तू मोठा झाला आहे. वारंवार तोंडात बोटे घालू नकोस. थंब गार्ड, सॉफ्ट मिटन्स किंवा हलके हातमोजे घालायला लावू शकता. त्यांना ही गोष्ट प्रेमाने समजावून सांगा. 

Web Title: How to stop thumb sucking in toddlers Simple remedies for kids sucking fingers Break thumb sucking habit in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.