Stomach Irritation Home Remedy : उन्हाळा सुरू झाला रे झाला की, शरीरात वेगवेगळे बदल जाणवू लागतात. घाम जास्त जातो, शरीराचं तापमान वाढतं, डिहायड्रेशनचा धोका वाढतो, सोबतच पोटात जळजळ होण्याचा त्रासही वाढतो. या दिवसांमध्ये पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असल्याने भूक मरते. त्यामुळे फक्त थंड पाणी पिण्याची किंवा थंड काहीतरी खाण्याची इच्छा अधिक होते. जास्त मसालेदार किंवा तिखट काही खाल्ल्याने पोटात आणि छातीत जळजळ होण्याची तक्रार या दिवसात बरेच लोक करतात. काही लोकांचं तर जळजळ होण्यासोबतच डोकंही दुखू लागतं. पण छातीत किंवा पोटात जळजळ होण्याचं कारण केवळ आहार नसून आम्ल आणि पित्त दोष हे आहेत.
पोटात आम्ल वाढलं कसं कळेल?
आयुर्वेदानुसार पोटात किंवा छातीत जळजळ ही शरीरात पित्त आणि आम्ल वाढल्याची लक्षणं असू शकतात. जेव्हा पित्त अधिक वाढतं तेव्हा वेगवेगळी लक्षणं दिसू लागतात. जसे की, पोटात जळजळ, आंबट ढेकर, डोकं जड वाटणे किंवा डोळ्यांमध्ये जळजळ. अशा स्थितीत आयुर्वेदात पित्त शांत करण्याच्या काही पेयांबाबत उल्लेख आहे. जसे की, शतावरी, शंख भस्म आणि ज्येष्ठमध. यांचा संतुलित वापर केल्यास शरीरातील अग्नि शांत होते आणि पित्त संतुलित करण्यास मदत मिळते.
उन्हाळ्यात अॅसिडिटी का वाढते?
या दिवसांमध्ये अॅसिडिटीचा त्रास वाढण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. जसे की, रात्री उशिरा जेवण करणे, अधिक मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे, जास्त चहा किंवा कॉफी पिणे, जास्त स्ट्रेस आणि जास्त वेळ उपाशीपोटी राहिल्याने आम्ल वाढतं. यासाठी शतावरी आणि शंखभस्म घेतलं जाऊ शकतं. दोन्ही गोष्टी समान प्रमाणात मिक्स करून घेतल्यास पोट थंड राहतं आणि आम्ल कमी होतं.
पोटातील जळजळ कशी शांत करावी?
पोटातील जळजळ जर शांत करायची असेल तर ज्येष्ठमध आणि खडी साखरही फायदेशीर ठरते. दोन्हींचं मिश्रण कोमट दुधात किंवा पाण्यात टाकून घेऊ शकता. याने पोटातील उष्णता शांत होते, छाती आणि घशातील जळजळ सुद्धा कमी होते.
आम्ल - पित्त शांत करण्याच्या इतर टिप्स
आम्ल - पित्तांची समस्या टाळायची असेल तर सूर्य मावळण्याआधी जेवण करावं. जेवण केल्यावर लगेच बसू नका हलका वॉक करा, याने अन्न चांगल्या प्रकारे पचन होण्यास मदत मिळेल आणि आंबट ढेकर येण्याचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात पोटाला थंड ठेवेल असा आहार घ्या, जसे की, खिचडी आणि दलिया.
Web Summary : Summer acidity? Ayurveda suggests cooling remedies like Shatavari, shankh bhasma, and licorice with sugar. Avoid late meals, spicy food, and stress. Eat cooling foods like khichdi for relief.
Web Summary : गर्मी में एसिडिटी? आयुर्वेद शतावरी, शंख भस्म और मुलेठी जैसे ठंडे उपचारों का सुझाव देता है। देर रात भोजन, मसालेदार भोजन और तनाव से बचें। राहत के लिए खिचड़ी जैसे ठंडे खाद्य पदार्थ खाएं।