ओव्हरईटिंग म्हणजेच अति खाल्ल्यामुळे वजन तर वाढतेच पण त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. अनेक वेळा आपण विचार न करता अति खातो. पण जेवण करण्यापूर्वी काही सवयी लावून तुम्ही ही समस्या टाळू शकता. त्याविषयी जाणून घेऊया...
उपाशी राहू नका
उपाशी राहिल्याने किंवा जेवण स्किप केल्याने तुम्हाला जास्त भूक लागते, ज्यामुळे जास्त खाण्याचा धोका वाढतो. हेल्दी स्नॅक्स खाण्याची किंवा दर काही तासांनी थोडं थोडं खाण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची लेव्हल स्थिर राहील आणि तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाणार नाही.
तणावापासून लांब राहा
तणावाचा थेट परिणाम तुमच्या भूकेवर होतो. २०१४ च्या एका अभ्यासानुसार, तणावामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे भूक वाढते आणि जास्त खाण्याची सवय लागते. योग, मेडिटेशन आणि व्यायामाद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
नाश्ता करा
सकाळचा नाश्ता हा दिवसभरासाठी उर्जेचा स्त्रोत असतो. संशोधनात असं दिसून आलं आहे की, जे लोक सकाळी प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट्सचा चांगला नाश्ता करतात ते दिवसभर कमी खातात. नाश्ता वगळल्याने भूक वाढते, ज्यामुळे जास्त खाण्याची शक्यता वाढते.
दर ४ तासांनी खा
भूक लागताच खाण्याची वेळ ठरवून घ्या. तुम्ही जास्त वेळ उपाशी राहिल्यास तुमचं शरीर झटपट उर्जेसाठी अधिक खाण्याचा आग्रह धरेल. दर ४-५ तासांनी काहीतरी पौष्टिक खा, जेणेकरून तुमचे पोट भरलेलं राहील.
डिस्ट्रॅक्शनपासून लांब राहा
टीव्ही पाहताना किंवा फोनवर स्क्रोल करताना खाल्लं तर ते तुमचे भुकेचे सिग्नल्स दाबतं. अशा परिस्थितीत तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाता. जेवताना, फक्त अन्नाकडे लक्ष द्या आणि ते काळजीपूर्वक चावून खा.