Join us

रात्री झोपेचं खोबरं होतं, पुन्हा पुन्हा लघवीला उठावं लागतं? ‘हे’ उपाय करा, लघवीचा त्रास होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:08 IST

Natural Remedy: रात्री लघवीला उठावं लागत असल्याने प्रवास करणंही अवघड होतं.

Natural Remedy: लघवी लागणं ही एक सामान्य बाब आहे. लघवीद्वारे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. पण बऱ्याच लोकांना रात्री पुन्हा पुन्हा लघवी लागते. ज्यामुळे झोपमोडही होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा-आळस जाणवतो. त्यासोबतच चिडचिडपणा वाढतो आणि फोकस करण्यास समस्या होते. तुमच्यासोबतही असंच होत असेल तर हा लेख आपल्या कामात येऊ शकतो. कारण यात आम्ही ही समस्या कशी दूर करता येईल याबाबत पाहणार आहोत.

आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यानी काही टिप्स सांगितल्या आहेत. जर आपल्याला रोज रात्री पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागत असेल, याची वेगवेगळी कारणं असू शकतात. जसे की, जास्त पाणी पिणे किंवा कॅफीन जास्त पिणं, यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI), डायबिटीस, पुरूषांमध्ये वाढलेले प्रोस्टेट, ब्लॅडर वीकनेस किंवा हार्मोनमध्ये बदल.

1. सायंकाळी लिक्विड पदार्थ कमी प्यावे. रात्री झोपायच्या 2 ते 3 तासांआधी पाणी, चहा, कॉफी किंवा इतर पेय पिऊ नका. फार जास्त लिक्विड शरीरात गेल्यानं ब्लॅडर लवकर भरतं आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते. वृद्धांमधये किडनीची कार्यक्षमता रात्री अधिक सक्रिय होते. ज्यामुळे लघवी अधिक तयार होते. त्यामुळे सायंकाळनंतर पाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. 

2. कॅफीन, चहा, कोल्ड ड्रिंक, दारू आणि तिखट जेवणामुळे ब्लॅडर उत्तेजित होतं. त्यामुळे ब्लॅडरचे स्नायू अधिक संवेदनशील होतात आणि कमी लघवी तार होऊनही लघवीची इच्छा होते. हे पदार्थ डाययुरेटिकही असतात. ज्यामुळे लघवी अधिक तयार होते आणि रात्री पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं. 

3. ब्लॅडर ट्रेनिंग एक अशी टेक्निक आहे. ज्यात लघवी आल्यावर लगेच बाथरूमला न जाता काही वेळ थांबावं लागतं. यामुळे हळूहळू ब्लॅडरची स्टोरेज लेव्हल वाढते आणि पुन्हा पुन्हा लघवी लागण्याची सवय कमी होते. ज्यांचं ब्लॅडर कमजोर आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट अधिक फायदेशीर ठरते 

घरगुती उपाय

- धण्याच्या पाण्यानं ब्लॅडरमधील जळजळ आणि सूज कमी होते.

- आवळा आणि मधानं इम्यूनिटी वाढते आणि ब्लॅडरची शक्तीही वाढते.

- अश्वगंधानं तणाव तर कमी होतोच, सोबतच ब्लॅडरचे स्नायू सुद्धा मजबूत होतात.

- डाळिंबाच्या सालीचं पावडर ब्लॅडरला टोन करतं आणि कंट्रोल वाढवतं.

- शतावरी पावडर घ्या.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स