Join us

ऑफिसात खुर्चीवर बसून मान-पाठ-कंबर दुखते? ५ सोप्या गोष्टी करा, दुखणं पळेल कायमचं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 14:55 IST

Is Your Lower Back Pain Increasing From Sitting On An Office Chair Adopt 5 Simple Tips For Relief : How to sit in an office chair to avoid lower back pain : How to relieve lower back pain in office : Relieve Your Back Pain With These Simple Tips : How To Avoid Low Back Pain Top 5 Tips : ऑफिसमध्ये दिवसभर खुर्चीवर बसून मान, पाठ, कंबर, पाय अवघडू नये म्हणून नेमकं काय करावं ते पाहा.

आपल्यापैकी बरेचजण ऑफिसमध्ये बैठे काम करतात. बैठे काम म्हटलं की तासंतास खुर्चीवर एकाच जागी बसून काम करणे आले. दिवसभरातील काही तास सलग एकाच जागी बसून शरीराची हालचाल न करता काम केल्यास त्याचा त्रास होतो. ऑफिसमध्ये (Relieve Your Back Pain With These Simple Tips) एकाच जागी खुर्चीवर बसून राहिल्याने पाठ आणि पाठीच्या (How to sit in an office chair to avoid lower back pain) खालच्या भागात वेदना होणे यांसारख्या समस्या सतावतात. खुर्चीवर चुकीची बसण्याची पद्धत, हालचालींचा अभाव, आणि कामाचा ताण यामुळे ही समस्या अधिक तीव्र होऊ शकते. खुर्चीवर तासंतास ( How to relieve lower back pain in office) बसून काम केल्याने मान, पाठ, कंबर आणि पाय यांसारख्या अवयवांची दुखणी कायमची मागे लागतात. दिवसभर खुर्चीत बसून राहिल्याने अनेकदा आपले स्नायू आखडतात, दुखू लागतात, कंबर व पायात लचक भरल्यासारखे वाटू लागते(Is Your Lower Back Pain Increasing From Sitting On An Office Chair Adopt 5 Simple Tips For Relief).

या समस्या सुरुवातील फारच किरकोळ वाटतात परंतु वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर त्याचे रूपांतर गंभीर समस्येत देखील होऊ शकते. ऑफिसमध्ये काम करताना दिवसभर एकाच जागी खुर्चीत बसून राहिल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी डोकं वर काढतात. मान, पाठ, कंबर आणि पाय यांसारख्या अवयवांवर कायमचा परिणाम होऊ शकतो. असे होऊ नये यासाठी, ऑफिसमध्ये काम करताना दिवसभर एकाच जागी खुर्चीवर बसून राहण्यापेक्षा आपण काही साध्यासोप्या टिप्स फॉलो करु शकतो, ज्यामुळे आपल्याला या समस्यांपासून मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो. ऑफिसमध्ये दिवसभर खुर्चीवर बसून मान, पाठ, कंबर आणि पाय अवघडू  नये म्हणून नेमकं काय करावं ते पाहा. 

ऑफिसमध्ये सतत खुर्चीवर एकाच जागी बसून राहू नका... 

१. खुर्चीत बसण्याची योग्य पद्धत :- खुर्चीत चुकीच्या पद्धतीने बसणे हे पाठीच्या दुखण्याचे सर्वात मोठे कारण ठरु शकते. त्यामुळे खुर्चीवर नेहमी सरळ बसा आणि पाठीचा खालचा भाग खुर्चीच्या पाठीमागील आधाराला टेकवून मगच बसा. खांदे सैल ठेवावेत आणि दोन्ही पाय जमिनीवर सरळ व सपाट पद्धतीने  ठेवावेत. जर पाय जमिनीला लागत नसतील तर फुटरेस्टचा वापर करा. तुमचा कॉम्प्युटर मॉनिटर डोळ्यांच्या समोर अगदी समान पातळीवर असावा, जेणेकरून मान पुढे झुकवण्याची गरज भासणार नाही. खुर्चीत बसताना आपले बॉडी पोश्चर योग्य पद्धतीने आहे का ते तपासून बघा. 

पालथं झोपण्याची सवय घातक, ठरु शकते हृदयविकाराचेही कारण- डॉक्टर सांगतात झोपण्याची योग्य पद्धत...

२. तासाला घ्या छोटा ब्रेक :- ऑफिसमध्ये दिवसभर सलग खुर्चीवर बसणे आपल्या पाठीसाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. त्यामुळे दर ४५ ते ६० मिनिटांनी खुर्चीवरून उठून ५ ते १० मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या. या दरम्यान तुम्ही थोडं चालू शकता, पाणी पिऊ शकता किंवा हलक्याफुलक्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता. यामुळे पाठीच्या आणि इतर स्नायूंना आराम मिळेल आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होईल. 

३. हलकी स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा :- तुमच्या ऑफिस डेस्कवर बसूनसुद्धा तुम्ही काही सोप्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता. मान, खांदे आणि पाठीच्या खालच्या भागाचे सौम्य स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ, दोन्ही हात वर उचलून पाठीला सौम्यपणे मागे झुकवा किंवा मान हळूहळू एका बाजूने दुसऱ्या बाजूला वळवा. अशा स्ट्रेचिंगमुळे स्नायूं आखडले असल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते सोबतच वेदना देखील कमी होतात. 

अपचन- गॅसेस- ॲसिडिटी-पोट फुगते? प्या ‘हा’ चहा, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय उपाय...

४. पुरेसं पाणी प्या :- शरीराच्या एकूण आरोग्यासाठी पुरेसं पाणी पिणं महत्त्वाचं आहेच, पण ते आपल्या पाठीच्या आरोग्यासाठीसुद्धा तितकंच आवश्यक आहे. आपल्या मणक्यांमध्ये असलेल्या डिस्क या शॉक अॅब्झॉर्बरचं काम करतात आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी शरीरात पुरेशी आर्द्रता असणं गरजेचं आहे. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास या डिस्क योग्य रीतीने कार्य करू शकतात आणि पाठीच्या वेदना होण्याचा धोका कमी होतो.  

५. ऑफिस चेअरची योग्य निवड :- जर तुम्ही ऑफिसमध्ये दीर्घकाळ बसून काम करत असाल, तर शरीराच्या ठेवणीला अनुरूप अशी एर्गोनोमिक खुर्ची निवडणं अत्यंत आवश्यक आहे. अशा खुर्च्या तुमच्या पाठीला योग्य आधार देतात आणि शरीराचे योग्य पोश्चर कायम ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे पाठीवर अनावश्यक ताण येत नाही आणि वेदनांचा त्रास कमी होतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सपाठीचे दुखणे उपाय