Join us

कानातील मळ अलगद बाहेर काढतील ५ सोपे उपाय; कानाला दुखापतीचा आणि बहिरेपणाचा धोका टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 13:23 IST

How to Remove Ear Wax Naturally at Home : इअरवॅक्स ही कोणत्याही प्रकारची घाण नाही. यामुळे कानाच्या संसर्गाचा धोका कमी होतो आणि बॅक्टेरियाजच्या वाढीस प्रतिबंध होतो.

कानात मळ जमा होणं हे खूपच कॉमन आहे. कानातील मळ साफ न केल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. कधी ऐकू कमी  येते तर कधी कानांमध्ये मळ साचल्यामुळे इन्फेक्शन होते तर कधी गंभीर स्वरूपाच्या वेदना होतात. (Ear Wax Removal Tips) कानात मळ साचण्याची अनेक कारणं असू  शकतात. जसं की हिवाळ्यात वातावरणातील बदलांमुळे ही समस्या वाढते कधी सर्दी होते तर कधी घसा दुखतो यामुळे कानही दुखू शकतो. (Earwax Removal Tips)

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार कानातून इअरवॅक्स सतत साफ करण्याची काही गरज नाही कारण इअरवॅक्स ही कोणत्याही प्रकारची घाण नाही. यामुळे कानाच्या संसर्गाचा धोका कमी होतो आणि बॅक्टेरियाजच्या वाढीस प्रतिबंध होतो.  कारण बॅक्टेरियांची वाढ  रोखणारे घटक त्यात असतात. (5 Things You Need to Know About Earwax Removal) तुमच्या कानांच्या पडद्यांना कोणतीही दुखापत झाली असेल किंवा इतर कारणामुळे कान दुखत असेल कर कानाची घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये. कान क्लिन करताना जर तुम्हाला वेदना जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. (How to Remove Ear Wax Easily and Safely)

तेलाचे २ ते ३  थेंब घाला

मोहोरीचे तेल कानांसाठी फायदेशीर ठरते. एका वाटीत मोहोरीचं तेल घ्या तेल कोमट  करून त्याचे काही थेंब कानात घाला. थोडावेळ असंच राहू द्या. त्यानंतर कानातील घट्ट मळ आपोआप मऊ होईल आणि बाहेरील बाजूला सरकेल.

पोट सुटलं-मांड्या जाडजूड दिसतात? थंडीत पपईच्या २-३ फोडी खा, सुटलेलं पोट होईल कमी

ग्लिसरिन

ग्लिसरीनचा उपयोग करून तुम्ही कानातील मळ बाहेर काढू शकता.  ग्लिसरिनसुद्धा तेलाप्रमाणे  काम करते. एका बॉटलमध्ये ग्लिसरिन घेऊन त्याचे काही थेंब कानात घाला. त्यानंतर थोडावेळ तसंच थांबा. ग्लिसरिनमुळे कानातील मळ सहज बाहेर निघण्यास मदत होईल आणि मळही साफ होईल.

बेकींग सोडा

बेकिंग सोडा पाण्यात मिसळून एका ड्रॉपरच्या साहाय्याने त्याचे काही थेंब कानात घाला. यामुळे मळ अगदी सहज दूर होईल आणि कानही स्वच्छ होईल. हा उपाय करण्यासाठी जास्त बेकींग सोडा घेऊ नका. थोड्याच प्रमाणात घ्या.

पाय दुखेपर्यंत चालता तरी पोट कमी होत नाही? चालण्याची योग्य वेळ-पद्धत पाहा, लवकर फिट व्हाल

कोमट पाणी

कोमट पाणी कानातील मळ काढण्यास फायदेशीर ठरते.  यासाठी गरम पाणी हलकं गरम करून घ्या. त्यानंतर ड्रॉपरच्या मदतीने कानात २-३ थेंब पाणी घाला. गरम पाण्यात तुम्ही चुटकीभर मीठसुद्धा घालू शकता.

बदामाचे तेल

बदामाचे तेल कानातला मळ दूर करण्यास फायदेशीर ठरतो. यात मॉईश्चर वाढवणारे गुण असतात. बदामाचे तेल थोडं कोमट करा. तेल जास्त गरम नसेल याची काळजी घ्या. कानात तेलाचे २-३ थेंब घालून पुन्हा थोडावेळ असेच ठेवा. त्यानंतर  इअरबड्सच्या साहाय्याने  मळ स्वच्छ करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य