कानातील मळ (Earwax) म्हणजेच इअरवॅक्स कानांमध्ये तयार झालेला एक नॅच्युरल चिकट पदार्थ असतो. कानातील मळ स्वत: शरीर तयार करते. यामुळे कानांची सुरक्षा होते. पण अधिक प्रमाणात कानात मळ साठल्यास तुम्हाला कानांच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो (How To Remove Earwax Instantly).
कानातील मळाचे बरेच फायदे आहेत. कानातील मळ बॅक्टेरिया, फंगस वाढवण्यापासून रोखतो ज्यामुळे कानांचे संक्रमण होत नाही. धूळ, माती, किटकांपासून संरक्षण करण्यासाठी एका नॅचरल फिल्टरप्रमाणे काम करतो. डॉक्टर किम यांनी कानांतील मळ बाहेर काढण्याचे काही उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे कानात शिरलेला मळ सहज बाहेर निघण्यास मदत होईल. (How To Remove Earwax From Ear At Home)
कानात इयरबड्स म्हणजेच कॉटन स्टिक घालू नका
सगळ्यात मोठी चूक लोक करतात ती म्हणजे कानात कॉटन स्टिक घालतात. असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. यामुळे कानातील मळ बाहेर येण्याऐवजी आत जाऊ शकतो ज्यामुळे कानांच्या पडद्यांवर दबाव येतो. डोकेदुखी, चक्कर येणं, ऐकण्याची क्षमता कमी होणं, कानाचे पडदे फाटणं अशा समस्या उद्भवू शकतात.
दिवाळीसाठी ब्लाऊज शिवून घेताय? १० नवीन स्लिव्हज पॅटर्न्स पाहा, स्टालिश-सुंदर लूक येईल
हायड्रोजन पेरोक्साईडचा वापर करा
हायड्रोजन पेरॉक्साईड प्रत्येक घरांमध्ये आढळतं. कानातील मळ वितळवण्यासाठी आणि मऊ करण्यासाठी प्रभावी ठरते. याचा वापर करताना सावधगिरी बाळगायला हवी. ज्यामुळे कानांचे पडदे फाटू शकतात. कोणतेही घरगुती उपाय करताना तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. (Ref)
सगळ्यात आधी एक ड्रॉपर घ्या त्यात थोडं हायड्रोजन पेरॉक्साईड भरा. कानात जवळपास 1 ते 2 थेंब घाला. अंघोळीनंतर 10 मिनिटांनी जेव्हा तुम्ही अंघोळ कराल तेव्हा शॉवरचं पाणी कानात जाऊन हळूहळू वितळलेला मळ बाहेर काढेल. यामुळे कानात साचलेला मळ हळूहळू बाहेर येण्यास मदत होते आणि कानही स्वच्छ होतात.
दिवाळीसाठी घ्या मोती पेंडंटचे मंगळसुत्र; १० नवीन, आकर्षक डिजाईन्स, सणासुधीला उठून दिसाल
कानात खाज येत असेल तर काय कराल?
अनेकदा मल सुकल्यामुळे कानांमध्ये खाज येते. डॉ. किम सांगतात की रोज १ थेंब मिनरल ऑईल कानांमध्ये घालू शकता. ज्यामुळे कानांच्या आतील त्वचा मऊ आणि मॉईश्चराईज राहील. ज्यामुळे खाजेपासून आराम मिळेल आणि मळही जमा होणार नाही.
Web Summary : Earwax protects ears, but excess needs removal. Avoid cotton swabs. Hydrogen peroxide softens wax; use cautiously after consulting a doctor. Mineral oil relieves itching from dry wax.
Web Summary : कान का मैल कानों की रक्षा करता है, लेकिन अधिकता को हटाना ज़रूरी है। कॉटन स्वाब से बचें। हाइड्रोजन पेरोक्साइड मैल को नरम करता है; डॉक्टर से सलाह के बाद सावधानी से प्रयोग करें। मिनरल ऑयल खुजली से राहत दिलाता है।