कोलेस्टेरॉल हा एक चिकट पदार्थ असतो जो शरीराद्वारे तयार केला जातो. शरीराला योग्य पद्धतीनं कार्य करण्यासाठी गुड कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. हाय कोलेस्टेरॉल धमन्यांमध्ये जमा होऊ लागते ज्यामुळं गंभीर समस्या उद्भवू शकतात. हाय कोलेस्टेरॉलमुळे रक्त वाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. (How To Remove Bad Cholesterol)
हाय कोलेस्टेरॉल हॉर्ट अटॅकचं कारणही ठरू शकतो. हे घातक बॅड कोलेस्टेरॉल वेळीच शरीराबाहेर फेकायला हवं अन्यथा तब्येतीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. रामदेव बाबांनी असेच काही उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी करता येईल. (Bad Cholesterol Control Tips)
बाबा रामदेव यांच्यामते हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी औषधं घेण्याऐवजी घरगुती उपाय करायला हवेत. बाबा रामदेव यांनी सांगितले जास्तीत जास्त पाणी पिण खूप गरजेचं आहे. पाणी शरीरातील घाणेरडं कोलेस्टेरॉल काढण्यास मदत करते.
लसूणसुद्धा कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी एक महत्वपूर्ण घटक आहे. रोज रिकाम्या पोटी लसूण खायला हवा. कांदा बारीक करून त्यात मध मिसळूनही खाऊ शकतात. रामदेव बाबा सांगतात हे उपाय शरीरातील घाणेरडं कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत करतात. ज्यामुळे हाय कोलेस्टेरॉलची समस्या उद्भवत नाही.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण का फायदेशीर ठरतो
लसणात एलिसिन असते जे एक सल्फर कम्पाऊंड आहे जे घातक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.रोज रिकाम्या पोटी एक लसूण खाऊ शकता.
JAMA जर्नलमधील अभ्यासात असे दिसून आले की, लसणाच्या नियमित सेवनाने एकूण कोलेस्टेरॉल आणि खराब कोलेस्टेरॉल मध्ये लक्षणीय घट होते. या अभ्यासाने लसूण पावडर किंवा लसूण अर्काचा नियमित वापर करणाऱ्या व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉल कमी झाल्याचे सिद्ध केले. लसणामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि सल्फर युक्त संयुगे भरपूर प्रमाणात असतात. त्यापैकी अँलिसिन (Allicin) हे एक महत्त्वाचे संयुग आहे, जे लसूण चिरल्यावर किंवा ठेचल्यावर तयार होते. अँलिसिन हेच लसणाला त्याचा विशिष्ट वास आणि आरोग्यदायी गुणधर्म देते. अनेक वैज्ञानिक संशोधनांमधून हे सिद्ध झाले आहे की, लसणामध्ये असलेले हे घटक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.