Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फक्त १५ दिवस आहारात करा छोटे बदल, तज्ज्ञ सांगतात शुगर राहील कण्ट्रोलमध्ये..

फक्त १५ दिवस आहारात करा छोटे बदल, तज्ज्ञ सांगतात शुगर राहील कण्ट्रोलमध्ये..

How to Reduce Sugar  : आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यामते डायबिटीज (टाइप 1 आणि 2) असलेल्यांनी  १५ दिवस हे उपाय केल्यास ब्लड शुगर नियंत्रणत  ठेवता येऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:12 PM2022-12-21T12:12:11+5:302022-12-21T16:54:22+5:30

How to Reduce Sugar  : आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यामते डायबिटीज (टाइप 1 आणि 2) असलेल्यांनी  १५ दिवस हे उपाय केल्यास ब्लड शुगर नियंत्रणत  ठेवता येऊ शकता.

How to Reduce Sugar  : Ayurveda doctor dixa bhavsar told 10 effective tips and ayurvedic powder to control blood sugar level in 15 days | फक्त १५ दिवस आहारात करा छोटे बदल, तज्ज्ञ सांगतात शुगर राहील कण्ट्रोलमध्ये..

फक्त १५ दिवस आहारात करा छोटे बदल, तज्ज्ञ सांगतात शुगर राहील कण्ट्रोलमध्ये..

डायबिटीसचा आजार वृद्धांसोबतच तरूणांमध्येही झपाट्यानं वाढत आहे. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक पथ्य पाळावी लगतात. इंसुलिन शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवते. ही क्रिया न झाल्यास शरीरातील साखरेचं प्रमाण वाढू लागतं आणि समस्यांची (Blood Sugar Level) जोखिम वाढते. 

डायबिटीस  संतुलित आहार आणि व्यायामानं नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो. यासाठी रुग्णांना खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला जातो.    ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांमुळे ब्लड शुगर वाढत नाही. काही औषधी वनस्पती आणि घरगुती उपायांनी तुम्ही शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवू शकता.  (Ayurveda doctor dixa bhavsar told 10 effective tips and ayurvedic powder to control blood sugar level in 15 days)

आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यामते डायबिटीज (टाइप 1 आणि 2) असलेल्यांनी  १५ दिवस हे उपाय केल्यास ब्लड शुगर नियंत्रणत  ठेवता येऊ शकता. यामुळे हृदय आणि किडनीच्या आजारांचीही जोखिम कमी होते. 

१) चहा किंवा कॉफीमध्ये दालचिनी पावडर मिसळा

२) जेवणाच्या १ तास आधी नंतर १० ते २० मिली ऑर्गेनिक  एपल सायडर व्हिनेगर घ्या

३) आठवड्यातून किंवा १५ दिवसातून एकदा मीठ, डेअरी उत्पादनं पदार्थ खाणं टाळा.

४) रिकाम्या पोटी १ चमचा भिजवलेली मेथी किंवा त्याचा चहा घ्या.

५)  दिवसभरात कमीत कमी २० मिनिटांसाठी व्यायाम किंवा प्राणायमाचा समावेश करा. 

६) आवड्यातून ६ तास व्यायाम करा

७) जेवणात लसणाचा वापर करा.

८)  रोज योग्य प्रमाणात पाणी प्या

९) कॅफिन, तळलेले पदार्थ, भात, साखर, मद्याचे सेवन करू नका.

१०) सिजनल फ्रुट्स आणि  भाज्याचे भरपूर सेवन करा. 

ब्लड शुगर कमी करण्यासाठी चुर्ण

बाजारात ब्लड शुगर कमी करण्यासाठी अनेक चुर्ण उपलब्ध आहेत. या चुर्णात कडूलिंब, गोक्षूर, गुडुची. इत्यादी एंटी डायबिटीक आयुर्वेदीक वनस्पतींचा समावेश असतो.  डॉक्टरांनी सांगितले की हे आयुर्वेदिक चूर्ण पूर्व-मधुमेह पूर्ववत करण्यासाठी प्रभावी आहेत. (प्रीडायबेटिस म्हणजे व्यक्ती मधुमेह होण्याच्या मार्गावर आहे, त्याची HbA1C पातळी 5.6 ते 6.5 च्या श्रेणीत आहे). इतकेच नाही तर ते टाइप I आणि टाइप II मधुमेह देखील व्यवस्थापित करते.

ही पावडर केवळ तुमची साखरेची पातळी नियंत्रित करत नाही तर ऊर्जा पातळी वाढवण्यास, कोलेस्टेरॉल रोखण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, चयापचय सुधारण्यासाठी, निरोगी यकृत आणि स्वादुपिंड, मधुमेह न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी आणि रेटिनोपॅथी यांसारख्या मधुमेहाची गुंतागुंत टाळण्यासाठी देखील मदत करते.
 

Web Title: How to Reduce Sugar  : Ayurveda doctor dixa bhavsar told 10 effective tips and ayurvedic powder to control blood sugar level in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.