How to reduce stomach bloating : ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगणे ही एक सामान्य समस्या आहे. सामान्यपणे महिलांमध्ये ही तक्रार जास्त पाहायला मिळते. चुकीचे खानपान, घाईघाईने खाणे, कमी पाणी पिणे किंवा ताणतणावामुळे पोट फुगते आणि जडपणा जाणवतो. पोटात गॅस अडकलेला वाटतो आणि शरीर हलके वाटत नाही. जर तुम्हालाही ही समस्या नेहमीच होत असेल, तर काही उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. न्यूट्रिशनिस्ट रीमा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर ब्लोटिंगपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी 3 सोपे उपाय सांगितले आहेत. ते पाहूयात.
10 मिनिटे वॉक करा
न्यूट्रिशनिस्ट रीमा सांगतात की, पोटात गॅस अडकला असेल किंवा भारीपणा वाटत असेल, तर फक्त 10 मिनिटे हलकी वॉक करा. वॉकमुळे पोटाच्या स्नायूंमध्ये हालचाल होते. त्यामुळे अडकलेला गॅस बाहेर पडण्यास मदत होते. फुगलेले पोट आणि जडपणा लवकर कमी होतो. म्हणून पोट फुगल्यास त्वरित 10 मिनिटांचा वॉक फायदा देतो.
खास ड्रिंक प्या
एका ग्लास पाण्यात चिमूटभर जीरे पूड, चिमूटभर ओवा, आणि थोडी बडीशेप घालून उकळून घ्या. नंतर हे पाणी गाळून हलकं गरम प्या. या तिन्ही मसाल्यांचे पोट बरं करण्यासाठी फायदे मिळतील. हे ड्रिंक प्यायल्याने ब्लोटिंगमध्ये झटपट आराम मिळतो.
एक फळ खा
ब्लोटिंग झाल्यास न्यूट्रिशनिस्ट एक फळ खाण्याचा सल्ला देतात. आपण सफरचंद, पपई, किंवा नाशपाती यापैकी काहीही खाऊ शकता. या फळांमध्ये भरपूर फायबर असतं, जे बाऊल मूव्हमेंट सुधारतं आणि त्यामुळे पोट फुगणे नैसर्गिकरीत्या कमी होतं.
