शाकाहारी लोकांच्या शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता नेहमी भासते. भारतात अनेक लोकांच्या शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दिसून येते. ज्यामुळे थकवा, कमकुवतपणा यांसारखे आजार होतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांवर चुकीचा परिणाम होतो, गट हेल्थचंही नुकसान होतं. या समस्यांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही आयुर्वेदीक ड्रिंकचं सेवन करू शकता. डॉक्टर आचार्य मनी यांनी एका खास ड्रिंकबाबत सांगितले आहे. हे ड्रिंक प्यायल्यानं तुमच्या शरीरातील व्हिटामीन बी-१२ कमतरता दूर होण्यास मदत होईल. हे ड्रिंक कसं तयार करायचं पाहूया. (How To Overcome Vitamin B-12 Deficienc) मेट्रोपोलिस हेल्थ केअरच्या रिपोर्टनुसार कलिंगडाच्या बिया तब्येतीसाठी बऱ्याच फायदेशीर ठरतात. यामुळे इम्युनिटी चांगली राहण्यास मदत होते. त्वचा आणि केस चांगले राहण्यासही मदत होते.
हे घरगुती ड्रिंक कसे तयार करावे?
हे ड्रिंक बनवण्यासाठी तुम्ही कलिंगडाच्या बिया वापरू शकता. कलिंगडाच्या बिया तुम्हाला ऑनलाईन स्टोअरमध्ये मिळतील किंवा आयुर्वेदीक सामानाच्या दुकानातही मिळतील. शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी-१२ आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी या बिया उत्तम पर्याय आहेत. शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता असेल तर हे घरगुती ड्रिंक तुम्ही तयार करू शकता.
२५० ग्रॅम टरबूजाच्या बिया घ्या आणि चारपट पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी मिक्सरमधून काढून याची पेस्ट तयार करा. नंतर यात पाणी घालून मंद आचेवर व्यवस्थित शिजवा. यात तुम्ही मीठ, जीरं पावडर, पुदीना किंवा धणे पूड घालू शकता. ही पेस्ट पातळ झाल्यानंतर एका आईस क्यूब ट्रेमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवा. कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामीन बी-१२ चा खजिना तयार आहे. आठवड्यातून २ वेळा हे आईस क्यूब तुम्ही पाण्यात घालून पिऊ शकता. अर्धा ग्लास पाण्यात घालून व्यवस्थित मिसळल्यानंतर या पाण्याचे सेवन करा.
शरीरात व्हिटामीन बी-१२ कमी झालंय कसं ओळखायचं?
पुरेसा आराम करूनही तुम्हाला खूप गळून गेल्यासारखं वाटत असे किंवा थकवा जाणवत असेल तर हे बी-१२ च्या कमतरतेचं मुख्य लक्षण असू शकतं. हातापायांमध्ये सतत सुया टोचल्यासारखं वाटणं हे मज्जासंस्थेवर परिणाम होत असल्याचं लक्षण आहे. तोंडात वारंवार फोडणं, जिभेवर सूज येणं ,जीभ गुळगुळीत दिसणं हे व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
