Join us

घरात दही नीट लागत नाही-पाणीच फार राहतं? १ खास ट्रिक; घट्ट, मलाईदार दही लागेल घरीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 19:29 IST

How To Make Thick Curd Or Dahi At Home : हिवाळ्याच्या  दिवसांत दही लावण्यासाठी तुम्ही कॅसरॉलचा वापर करू शकता.

हिवाळा असो किंवा उन्हाळा दही खाण्याचे शौकीन असलेले लोक दही खाण्याचा एकही चान्स सोडत नाहीत.  दही खाल्ल्यानं शरीरालाही बरेच फायदे  मिळतात. दुकानात लहान किंवा मोठ्या पाकीटात तुम्ही दही सहज विकत घेऊ शकता. हिवाळ्याच्या दिवसांत दही व्यवस्थित लागत नाही तेव्हा समस्या वाढते. (How To Make Thick Curd Or Dahi)

तापमानात बदल झाल्यामुळे दही लावलायला त्रास होतो. जसजसं तापमान कमी होतं तसतसं परफेक्ट दही  लागण्याची संभावना कमी होते. दही पाण्यासारखं पातळ होतं आणि चव बिघडते. दही व्यवस्थित लागत नाही. सोशल मीडियावर व्हायरल एक ट्रिक व्हायरल होत आहे जी तुमच्या कामात येईल. (How To Make Thick Curd Or Dahi At Home)

सगळ्यात आधी दूध गरम करून घ्या

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका कंटेट क्रिएटरनं सांगितलं की दही घट्ट लावण्यासाठी मलई जमा करायला हवी. यासाठी दूध मंद आचेवर गरम करून घ्या. नंतर दूध  रूम टेम्परेचरवर थंड करून घ्या. ज्यामुळे घट्ट मलई तयार होईल. नंतर एका वाटीत थोडं दही आणि पाणी मिसळून मिश्रण तयार करा. जेव्हा मलई तयार होईल तेव्हा पाण्यात दही मिसळून मिक्सरलला दूध मिसळा.  यासाठी मलईला थोडी बाजूला काढून घ्या.  नंतर हे मिश्रण घाला.  7 ते 8 तासांसाठी तसंच सोडून द्या.  यानंतर आईस्क्रीमसारखं घट्ट दही तयार होईल.

हिवाळ्याच्या  दिवसांत दही लावण्यासाठी तुम्ही कॅसरॉलचा वापर करू शकता. कारण कॅसरॉलमध्ये उष्णता टिकून राहते. दूध जास्तवेळ गरम राहतं त्यामुळे दही सहज लागतं. यासाठी दूध गरम केल्यानंतर थोडं थंड होऊ द्या. नंतर 1 ते 2 चमचे दूध पावडर, एक चमचा दही स्टार्टर मिसळा. दूध व्यवस्थित फेटून कॅसरॉलमध्ये घाला. टॉवेल लपटून कमी उजेड असलेल्या ठिकाणी ठेवा ज्यामुळे दही घट्ट जमेल.

या गोष्टींची काळजी घ्या

दूधाचं तापमान निर्धारीत करते की दही कसं सेट व्हायला हवं. थंड किंवा गरम तापमान असेल  तर दही सेट होण्याची प्रक्रिया कठीण होते. यासाठी दूध व्यवस्थित उकळवून घ्या मग आच बंद करा. नंतर उकळलेलं दूध 20 टक्के थंड होऊ द्या. दूध सेट होण्यासाठी ठेवा. जवळपास 1 चमचा दह्यासोबत अर्धा किलो दूध मिसळा ज्यामुळे दूध सहज सेट होईल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य