Join us

लसणाची सालं फेकून देता? 'या' पद्धतीनं करा घरगुती लसूण पावडर, खर्च न करता मिळेल लसणाचा फ्लेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 23:11 IST

लसणाची सालं एक उत्तम सिजनिंग इंग्रेडिएंट आहेत. जी तुम्हाला अनेक रेसिपीजमध्ये वापरता येतील.

लसणाची सालं अनेकदा आपल्या किचनमध्ये निरूपयोगी समजून फेकून दिली जातात.  ही सालं सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का याच सालींचा वापर करून तुम्ही फ्लेवरफूल गार्लिक पावडर बनवू शकता.  (How To Make Homemade Garlic Powder) लसणाची सालं एक उत्तम सिजनिंग इंग्रेडिएंट आहेत.

जी तुम्हाला अनेक रेसिपीजमध्ये वापरता येतील. ज्यामुळे पदार्थाला चांगली चव येईल. इतकंच नाही तर फ्लेवरही वाढेल.  आरोग्याच्या दृष्टीनंही याचे अनेक फायदे आहेत. लसणाच्या मदतीने तुम्ही लसणाची पावडर बनवू शकता. (How To Make Homemade Garlic Powder For Flavourful Seasoning With Garlic Peel)

लसणाची पावडर बनवण्याची योग्य पद्धत

सगळ्यात आधी लसूण व्यवस्थित धुवून घ्या. जेणेकरून त्यावर कोणतीही घाण किंवा किटकनाशक असतील तर निघून जातील. नंतर ही सालं उन्हात व्यवस्थित सुकवून घ्या.

ओटीपोट सुटलं, मागचा भागही वाढला? ‘हा’ चिमूटभर मसाला पाण्यात मिसळून प्या, स्लिम-फिट दिसाल

जर तुम्ही ऊन्हात सुकवू शकत नसाल तर ओव्हनमध्ये सुकवू शकता. सुकल्यानंतर ही सालं मिक्सर ग्राईंडरमध्ये घालून व्यवस्थित वाटून घ्या. ही पावडर तुम्ही कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. जेव्हा गरज असेल तेव्हा याचा वापर करा.

पीठ मळताना सॅलेड, सूप बनवताना, भातात फ्लेवर घालण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.  यामुळे युनिक टेस्ट येईल आणि रेस्टोरंटसारखी स्पेशल रेसिपी बनेल.

रोज चालता तरी १ इंचही पोट कमी होत नाही? अनवाणी पायांनी चालण्याचे ५ फायदे, सूज होईल कमी

जेव्हा तुम्ही लसणाचा वापर कराल तेव्हा सालं बाहेर फेकण्याऐवजी कोणत्याही भांड्यात ठेवा. जेव्हा सालं भरपूर जमा होतील तेव्हा याची पावडर बनवून कुकींगसाठी वापरा.

टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स