Pyria Home Remedies : दात मजबूत, चमकदार ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. ही एक अशी सवय आहे ज्यामुळे दात आणि हिरड्यांचं आरोग्या चांगलं राहतं. पण आपल्याचा अशा काही चुकांमुळे दोनदा ब्रश करूनही अनेकांना पायरियाची समस्या होते.
पायरिया दातांवर होणारं एक क्रॉनिक इन्फेक्शन आहे, ज्यामुळे हिरड्यांवर सूज येते. पुढे दात मजबूत ठेवणारे लिगामेंट, मुलायम टिश्यू आणि हाडंही कमजोर होतात. जर वेळीच ही समस्या दूर केली नाही तर तोंडाचं आरोग्य बिघडतं.
पायरिया दूर करणारा उपाय
आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी पायरिया मुळापासून दूर करण्याचा एक उपाय शेअर केला आहे. हा एक सोपा उपाय असून यासाठी ४ गोष्टींची गरज भासेल. या गोष्टींसाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही, कारण या गोष्टी किचनमध्येच मिळतील.
डॉक्टरांनी सांगितलं की, आजकाल लोक दोनदा ब्रश करतात, पण तरी सुद्धा प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीच्या हिरड्यांमधून रक्त येतं, त्यांना पायरिया होता किंवा तोंडाची दुर्गंधी येते. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी या समस्येला कारणीभूत ठरतात.
यावर उपचार करण्यासाठी दिवसातून दोनदा एसएलएस फ्लोराइडसारख्या केमिकल असलेल्या टूथपेस्टनं ब्रश करण्यास सांगितलं जातं. डॉक्टर म्हणाले की, एसएलएस हे डिटर्जंटमध्ये आढळतं.
आयुर्वेदिक उपाय
१० ग्रॅम लवंग
२० ग्रॅम हळद
३० ग्रॅम तमालपत्र
४० ग्रॅम सैंधव मीठ
या सगळ्या गोष्टी बारीक करून पावडर बनवा. ही पावडर एका एअरटाईट डब्यात स्टोर करा. सकाळी आणि सायंकाळी अर्धा चमचा पावडर घेऊन त्यात मोहरीचं तेल मिक्स करा. ब्रश किंवा बोटांच्या मदतीनं याने हिरड्यांची मसाज करा. जे लोक पायरियाच्या स्थितीत तुरटीची पेस्ट वापरू शकत नाही, त्यांचासाठी हा उपाय चांगला आहे.
पायरियाची लक्षणं
तोंडाची दुर्गंधी येणे
हिरड्यांचा रंग जास्त लाल होणे
हिरड्यांमधून रक्त येणे
दात सैल होणे
हिरड्यांवर सूज
दातांमध्ये गॅप येणे
दातांमध्ये झिणझिण्या